सारा तेंडुलकरचा मल्टीकलर लेहेंगा लूक ठरतोय ट्रेंड; करवल्यांसाठी खास फॅशन आयडिया, लग्नसराईत उठून दिसाल

अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंग मेहेंदी सोहळ्यात सारा तेंडुलकरचा रंगीबेरंगी लेहेंगा आणि पारंपरिक स्टाइल विशेष चर्चेत आली. तिच्या या लूकमधून मेहेंदी किंवा लग्नसमारंभासाठी परफेक्ट फॅशन आयडिया घेता येऊ शकतात.
सारा तेंडुलकरचा मल्टीकलर लेहेंगा लूक ठरतोय ट्रेंड; करवल्यांसाठी खास फॅशन आयडिया, लग्नसराईत उठून दिसाल
सारा तेंडुलकरचा मल्टीकलर लेहेंगा लूक ठरतोय ट्रेंड; करवल्यांसाठी खास फॅशन आयडिया, लग्नसराईत उठून दिसाल
Published on

सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबात सध्या लग्नाची लगबग सुरू असून अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सारा तेंडुलकरचा लेहेंगा लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मिलाफ असलेला तिचा हा लूक अनेक तरुणींच्या पसंतीस उतरत आहे. लग्नसमारंभ, मेहेंदी किंवा संगीतसारख्या कार्यक्रमांसाठी साराचा हा लूक उत्तम स्टाइल इन्स्पिरेशन ठरू शकतो.

साराने परिधान केलेला मल्टीकलर लेहेंगा, आकर्षक ज्वेलरी आणि साधी पण एलिगंट हेअरस्टाइल यामुळे तिचा संपूर्ण लूक सणासुदीच्या वातावरणाला साजेसा दिसत होता. जर तुम्हीही लग्नसमारंभासाठी खास लूक शोधत असाल, तर साराच्या स्टाइलमधून या काही फॅशन टिप्स नक्की ट्राय करू शकता.

मल्टीकलर लेहेंगा - फेस्टिव लूकसाठी बेस्ट

साराने गडद गुलाबी, लाल आणि हिरव्या छटा असलेला मल्टीकलर लेहेंगा परिधान केला होता. अशा प्रकारचा रंगीबेरंगी लेहेंगा मेहेंदी किंवा संगीतसारख्या कार्यक्रमांसाठी उत्तम पर्याय ठरतो. तेजस्वी रंगांमुळे लूक अधिक आकर्षक वाटतो.

हेवी ब्लाउज + फ्लोई स्कर्ट

साराच्या लूकमध्ये ब्लाउजवरील नाजूक भरतकाम आणि घेरदार स्कर्ट यांचा उत्तम समतोल दिसत होता. जर तुमचा ब्लाउज हेवी असेल तर स्कर्ट साधा आणि फ्लोई ठेवणे हा स्टाइलचा उत्तम फॉर्म्युला ठरू शकतो.

स्टेटमेंट ज्वेलरीने वाढवा लूकचा ग्लॅम

साराने मोठा नेकलेस, मॅचींग कानातले, बांगड्या आणि बिंदी घालून आपला लूक पूर्ण केला. अशा स्टेटमेंट ज्वेलरीमुळे साधा लेहेंगाही अधिक आकर्षक दिसू शकतो.

साधी हेअरस्टाइल, पण एलिगंट

साराने केसांची वेणी घातली होती. लग्नसमारंभासाठी खूप क्लिष्ट हेअरस्टाइल करण्याऐवजी साधी वेणी किंवा सॉफ्ट वेव्ह्ससारखी हेअरस्टाइल लूकला एलिगंट टच देते.

सारा तेंडुलकरचा मल्टीकलर लेहेंगा लूक ठरतोय ट्रेंड; करवल्यांसाठी खास फॅशन आयडिया, लग्नसराईत उठून दिसाल
देसी गर्लचा ग्लॅमरस अवतार! ब्राइडल लूकसाठी परफेक्ट आयडिया; प्रियांका चोप्राचे लेटेस्ट फोटो पाहाच

मेकअप ठेवा सॉफ्ट आणि ग्लोई

साराचा मेकअप सॉफ्ट आणि ग्लोई होता. न्यूड लिपस्टिक, हलका आयमेकअप आणि ग्लोई स्किन यामुळे संपूर्ण लूक अधिक नैसर्गिक आणि आकर्षक दिसतो.

लग्नसराईच्या हंगामात पारंपरिक पोशाखात थोडा मॉडर्न टच हवा असेल, तर सारा तेंडुलकरचा हा लूक नक्कीच परफेक्ट स्टाइल इन्स्पिरेशन ठरू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in