Saree Styling Tips : साडीमध्ये दिसायचंय लाखांत एक? स्टायलिंगच्या या ५ गोष्टी विसरू नका

साडी नेसून अधिक सुंदर आणि एलिगंट दिसायचंय? ब्लाऊजपासून दागिने, हेअरस्टाईल आणि बॉर्डरपर्यंत काही छोट्या स्टायलिंग टिप्स तुमचा संपूर्ण लूक बदलू शकतात. जाणून घ्या साडी नेसताना कोणत्या ५ गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
Saree Styling Tips : साडीमध्ये दिसायचंय लाखांत एक? स्टायलिंगच्या या ५ गोष्टी विसरू नका
Saree Styling Tips : साडीमध्ये दिसायचंय लाखांत एक? स्टायलिंगच्या या ५ गोष्टी विसरू नका
Published on: 

साडी कितीही साधी असली तरी योग्य ब्लाऊज, दागिने आणि हेअरस्टाईलची निवड केली तर संपूर्ण लूक अधिक देखणा आणि आकर्षक दिसू शकतो. उलट महागडी किंवा भरजरी साडी नेसूनही स्टायलिंगमध्ये काही चुका झाल्या तर लूक अपेक्षेप्रमाणे खुलत नाही. सण, लग्नसमारंभ किंवा खास कार्यक्रमासाठी साडी नेसताना काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा लूक अधिक एलिगंट दिसू शकतो.

भरजरी साडीवर साधं ब्लाऊज

साडीवर आधीच जरी, सिक्विन्स किंवा भरपूर एम्ब्रॉयडरी असेल तर ब्लाऊजवर पुन्हा खूप वर्क करण्याची गरज नाही. साध्या डिझाइनचं ब्लाऊज निवडल्यास साडीचा लूक अधिक संतुलित दिसतो.

Saree Styling Tips : साडीमध्ये दिसायचंय लाखांत एक? स्टायलिंगच्या या ५ गोष्टी विसरू नका
Full Sleeves Blouse Designs : लांब बाह्यांच्या ब्लाऊजची फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये; साडीसोबत ट्राय करा 'या' स्टायलिश डिझाइन्स

गडद साडीसोबत रंगांचा समतोल

साडीचा रंग खूप गडद किंवा उठावदार असेल तर त्याच रंगाचा भडक ब्लाऊज निवडण्याऐवजी कॉन्ट्रास्ट किंवा सौम्य रंगाचा पर्याय निवडा. त्यामुळे साडी अधिक खुलून दिसते.

साध्या साडीवर दागिन्यांचा प्रयोग

प्लेन, छोट्या बुटीची किंवा नाजूक काठाची साडी असेल तर मोठे झुमके, स्टेटमेंट नेकलेस किंवा थोडे हेवी दागिने लूकमध्ये उठाव आणू शकतात. मात्र भरजरी साडीवर खूप दागिने घातल्यास लूक गर्दीचा वाटू शकतो.

हेअरस्टाईलही महत्त्वाची

साध्या साडीसोबत मोकळे केस छान दिसतात. मात्र साडीवर भरपूर वर्क असेल तर बन, पोनीटेल किंवा नीट बांधलेली हेअरस्टाईल अधिक उठून दिसू शकते.

Saree Styling Tips : साडीमध्ये दिसायचंय लाखांत एक? स्टायलिंगच्या या ५ गोष्टी विसरू नका
केस फ्रिझी आणि निस्तेज झालेत? किचनमधील 'या' पदार्थांपासून तयार करा होममेड हेअर मास्क

शरीरयष्टी लक्षात घेऊन साडी निवडा

उंची कमी असल्यास खूप रुंद काठ किंवा अतिशय मोठ्या डिझाइनची साडी टाळून छोट्या प्रिंट्स, अरुंद बॉर्डर किंवा हलक्या वर्कची साडी निवडल्यास लूक अधिक संतुलित दिसू शकतो.

साडी सुंदर दिसण्यासाठी फक्त तिची किंमत किंवा डिझाइन महत्त्वाची नसते. योग्य स्टायलिंग, कमीतकमी ॲक्सेसरीज आणि स्वतःला शोभणारी निवड केल्यास साधी साडीही खास दिसू शकते.

logo
marathi.freepressjournal.in