

पपई हे फळ खाण्यास जितके फायदेशीर, तितकेच त्वचेच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, बी तसेच सी असते, जे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा मऊ, उजळ आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसते.
घरच्या घरी पपईचा वापर करून तुम्ही चेहऱ्याची काळजी घेऊ शकता. कोणत्याही केमिकलशिवाय नैसर्गिक पद्धतीने त्वचा स्वच्छ आणि टवटवीत दिसण्यासाठी खालील दोन सोपे फेस पॅक करून बघा -
एक पिकलेली पपई घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटांनी धुवून टाका. लिंबातील व्हिटॅमिन सी आणि पपईतील पेप्सिन एकत्रितपणे त्वचेतील घाण खोलवर स्वच्छ करतात आणि रंग उजळवतात.
थोडी पिकलेली पपई मॅश करून त्यात दोन चमचे दही घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा, १५ मिनिटांनी सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्या. हा फेस पॅक त्वचेला मऊपणा देतो, कोरडेपणा कमी करतो आणि त्वचेची नैसर्गिक चमक वाढवतो.
पपईचे असे नैसर्गिक फेस पॅक नियमित वापरल्यास त्वचा तजेलदार दिसते आणि डेड स्किनचे प्रमाण कमी होते. केवळ आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यानेच चेहऱ्यावरचा थकवा आणि निस्तेजपणा नाहीसा होतो.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)