Soya Kheema Recipe: रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मसाला सोया खिमा; चव अगदी रेस्टॉरंटसारखी

चपाती किंवा भाकरीसोबत नेहमीची भाजी खाऊन कंटाळला असाल तर बनवा चमचमीत मसाला सोया खिमा. सोयाबीनपासून झटपट रेस्टॉरंट स्टाईल खिमा बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
Soya Kheema Recipe: रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मसाला सोया खिमा; चव अगदी रेस्टॉरंटसारखी
Soya Kheema Recipe: रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मसाला सोया खिमा; चव अगदी रेस्टॉरंटसारखी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

Soya Kheema Recipe : रोजच्या जेवणात त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळं करून पाहा. सोयाबीनपासून बनणारा मसाला सोया खिमा चपाती, भाकरी किंवा पराठ्यासोबत छान लागतो. सोयाबीनला मसालेदार ग्रेव्हीची चव दिल्यामुळे हा पदार्थ नेहमीच्या भाजीपेक्षा थोडा वेगळा लागतो. विशेष म्हणजे यासाठी लागणारे साहित्यही सहज घरात उपलब्ध असते. चला तर मग जाणून घेऊया झटपट तयार होणाऱ्या चमचमीत सोया खिम्याची रेसिपी.

सोया खिमा बनवण्यासाठी साहित्य

  • सोयाबीन - १ वाटी

  • कांदा - १ बारीक चिरलेला

  • टोमॅटो - २, पेस्ट केलेले

  • हिरवे वाटाणे - ½ वाटी

  • दही - २ चमचे

  • बेसन - १ चमचा

  • आलं-लसूण पेस्ट - १ चमचा

  • लाल तिखट - १ चमचा

  • हळद - ½ चमचा

  • धणे पावडर - १ चमचा

  • जिरे पावडर - ½ चमचा

  • गरम मसाला - ½ चमचा

Soya Kheema Recipe: रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मसाला सोया खिमा; चव अगदी रेस्टॉरंटसारखी
डाएटवाल्यांसाठी खास! नाश्त्यात बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की; १० मिनिटांत होईल तयार
Soya Kheema Recipe: रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मसाला सोया खिमा; चव अगदी रेस्टॉरंटसारखी
डाळ भिजवायची झंझट नको! झटपट करा कुरकुरीत सोयाबीन मेदूवडा, चहासोबत लागेल मस्त
  • किचन किंग मसाला - ½ चमचा

  • खडे मसाले - आवश्यकतेनुसार

  • कसुरी मेथी - ½ चमचा

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - आवश्यकतेनुसार

  • कोथिंबीर - सजावटीसाठी

सोयाबीनची अशी करा तयारी

सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करून त्यात सोयाबीन ५ ते ७ मिनिटे भिजत ठेवा. सोयाबीन मऊ झाल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका. त्यानंतर मिक्सरमध्ये सोयाबीन घालून जाडसर वाटून घ्या. वाटताना पाणी घालू नका, यामुळे खिम्यासारखा पोत मिळण्यास मदत होईल.

मसाल्याचं मिश्रण आधी तयार करा

एका वाटीत दही घेऊन त्यात लाल तिखट, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, बेसन आणि मीठ घाला. हे सर्व साहित्य एकत्र करून बाजूला ठेवा.

कढईत तयार करा चमचमीत खिमा

कढईत तेल गरम करून त्यात खडे मसाले घाला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून परता. कांदा थोडा परतल्यानंतर टोमॅटोची पेस्ट घाला आणि मिश्रणातून तेल सुटेपर्यंत मंद आचेवर शिजवा.

आता त्यात आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट आणि हळद घालून मसाला चांगला परतून घ्या. तयार केलेलं दह्याचं मसाला मिश्रणही कढईत घालून काही वेळ शिजवा.

Soya Kheema Recipe: रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मसाला सोया खिमा; चव अगदी रेस्टॉरंटसारखी
काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतंय? करून पाहा कांदा-टोमॅटो बन
Soya Kheema Recipe: रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मसाला सोया खिमा; चव अगदी रेस्टॉरंटसारखी
Shravan Special : बाहेरून कुरकुरीत, आतून चटपटीत! उपवासाचे मिरची वडे कसे बनवायचे?

यानंतर वाटलेलं सोयाबीन कढईत घालून सर्व मिश्रण एकजीव करा. मंद आचेवर सोया खिमा व्यवस्थित शिजू द्या. गरजेनुसार थोडे पाणी घालून खिम्याचा पोत आपल्या आवडीनुसार ठेवू शकता.

शेवटी घाला वाटाणे आणि कसुरी मेथी

सोया खिमा शिजल्यानंतर त्यात उकडलेले हिरवे वाटाणे आणि कसुरी मेथी घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून आणखी काही मिनिटे शिजवा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

गरमागरम मसाला सोया खिमा चपाती, भाकरी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in