डाळ भिजवायची झंझट नको! झटपट करा कुरकुरीत सोयाबीन मेदूवडा, चहासोबत लागेल मस्त

संध्याकाळच्या चहासोबत कुरकुरीत नाश्ता हवा असेल तर सोयाबीन मेदूवडा करून पाहा. सोयाबीन, बटाटा आणि तांदळाच्या पिठापासून झटपट तयार होणारी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.
डाळ भिजवायची झंझट नको! झटपट करा कुरकुरीत सोयाबीन मेदूवडा, चहासोबत लागेल मस्त
डाळ भिजवायची झंझट नको! झटपट करा कुरकुरीत सोयाबीन मेदूवडा, चहासोबत लागेल मस्त'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची चहाची वेळ, गरमागरम आणि कुरकुरीत वडा समोर आला की मोह आवरणं कठीण होतं. मात्र पारंपरिक मेदूवड्यासाठी उडीद डाळ आधी भिजवावी लागते आणि नंतर तिचं पीठ तयार करावं लागतं. त्यामुळे अचानक वडा खावासा वाटला तर झटपट पर्याय शोधावा लागतो. अशावेळी सोयाबीनपासून तयार होणारा हा इन्स्टंट मेदूवडा करून पाहता येईल.

सोयाबीन, बटाटा आणि तांदळाचं पीठ वापरून तयार होणाऱ्या या वड्यांना ब्रेड क्रम्ब्सचं आवरण दिल्यामुळे ते बाहेरून छान कुरकुरीत होतात. सोयाबीनमुळे या पदार्थातून प्रोटीनही मिळते. हिरवी चटणी, नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत हा गरमागरम नाश्ता आणखी चविष्ट लागतो.

लागणारे साहित्य

सोयाबीन - १ वाटी
हिरव्या मिरच्या - २
उकडून किसलेला बटाटा - १
तांदळाचे पीठ - १ वाटी

डाळ भिजवायची झंझट नको! झटपट करा कुरकुरीत सोयाबीन मेदूवडा, चहासोबत लागेल मस्त
काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतंय? करून पाहा कांदा-टोमॅटो बन


कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार
ब्रेड क्रम्ब्स - आवश्यकतेनुसार
पाणी - गरजेनुसार
तेल - तळण्यासाठी

कृती

सर्वप्रथम सोयाबीन गरम पाण्यात साधारण ५ ते १० मिनिटे ठेवा. ते मऊ झाल्यानंतर त्यातील पाणी व्यवस्थित पिळून काढा. आता मिक्सरमध्ये सोयाबीन आणि हिरव्या मिरच्या घालून मिश्रण किंचित जाडसर वाटून घ्या.

एका मोठ्या भांड्यात वाटलेले सोयाबीन घ्या. त्यात उकडून किसलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि तांदळाचे पीठ घालून सर्व साहित्य चांगले एकत्र करा. शक्यतो अतिरिक्त पाणी न घालता घट्टसर मिश्रण तयार करा.

डाळ भिजवायची झंझट नको! झटपट करा कुरकुरीत सोयाबीन मेदूवडा, चहासोबत लागेल मस्त
Shravan Special : अळूवडी करायची म्हणजे मोठा तामझाम? 'ही' सोपी रेसिपी ट्राय करा

तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून हाताला थोडे तेल लावा. प्रत्येक गोळा थोडा चपटा करून त्याच्या मधोमध बोटाने छिद्र पाडा. अशाप्रकारे सर्व वडे तयार करून घ्या.

दुसऱ्या वाटीत थोडे तांदळाचे पीठ आणि पाणी मिसळून पातळसर मिश्रण तयार करा. प्रत्येक वडा प्रथम या मिश्रणात हलक्या हाताने बुडवा आणि त्यानंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवा. यामुळे तळल्यानंतर बाहेरील भाग अधिक कुरकुरीत होईल.

कढईत तेल गरम करा. तेल योग्य प्रमाणात गरम झाल्यानंतर वडे सोडा आणि मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा. तयार वडे टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या.

गरमागरम सोयाबीन मेदूवडे हिरवी चटणी, नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in