
गोड खाणं म्हटलं की लगेचच डोळ्यांसमोर चॉकलेट, कॅडबरी, मिठाई असे पदार्थ येतात. या सर्व पदार्थांत साखर आणि गूळ असतंच. पण साखर आणि त्यात सेंद्रिय गूळ नसेल तर आजारपणांना आमंत्रणच. त्यामुळे डॉक्टर साखर किंवा गूळ टाळण्याचा सल्ला देतात. मग जिभेवर गोडवा आणणार कुठून? तुम्हाला माहितीये का, साखर आणि गुळाशिवाय देखील गोड पदार्थ बनवता येतात. जे टेस्टीही लागतात सोबतच हेल्दीही असतात.
खजूर, अंजीर, मनुका, केळी किंवा सफरचंद यांसारख्या फळांत नैसर्गिक गोडवा असतो. म्हणूनच नुसतं साखरेवर अवलंबून न राहता आपण यांचा वापर करून हेल्दी आणि पौष्टिक असे गोड पदार्थ बनवू शकतो. यासाठी खास तुमच्यासाठी घेऊन आलोय काही झटपट तयार होणाऱ्या आणि तितक्याच आरोग्यदायी गोड रेसिपीज.
साहित्य :
बियाशिवाय खजूर - १ वाटी
बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते - ½ वाटी
तूप - १ चमचा
वेलची पूड - ¼ चमचा
कृती :
ड्रायफ्रूट्स हलके भाजून घ्या. खजूर मिक्सरमध्ये जाडसर करून कढईत परता. त्यात ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड मिसळा. हाताला तुप लावून लाडू वळा. ही झटपट रेसिपी एनर्जीने भरलेली आणि खूप टेस्टी लागते.
...............................
साहित्य :
सुके अंजीर - ६-७
खजूर - ८-१०
बदाम, काजू - ¼ वाटी
तूप - १ चमचा
कृती :
अंजीर गरम पाण्यात भिजवून जाडसर वाटा. खजूर मिक्सरमध्ये करून घ्या. तुपात ड्रायफ्रूट्स भाजून घ्या, त्यात अंजीर-खजूर टाका. मिश्रण घट्ट झालं की तुप लावलेल्या ताटात पसरा. थंड करून चौकोनी तुकडे करा.
...............................
साहित्य :
पिकलेलं केळं - २
ओट्स पीठ - १ कप
दूध - ½ कप
बेकिंग पावडर - ½ चमचा
सुका मेवा - सजावटीसाठी
कृती :
केळी मॅश करून त्यात दूध, ओट्स पीठ, बेकिंग पावडर मिसळा. ग्रीस केलेल्या मोल्डमध्ये ओतून १८०° सेल्सियसवर २० मिनिटं बेक करा. वरून ड्रायफ्रूट्स टाका. हा हेल्दी केक नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
...............................
साहित्य :
खजूर - ½ कप
मनुका - ¼ कप
अक्रोड - ¼ कप
ओट्स - ¼ कप
वेलची पूड
कृती :
सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करून गोळा तयार करा. छोटे छोटे बॉल्स वळा आणि लगेच खायला द्या. ही फक्त ५ मिनिटांत तयार होणारी हेल्दी स्नॅक आहे.
...............................
तर अशा या गोड पदार्थांमध्ये गूळ, साखर किंवा मध अजिबात नाही, तरी नैसर्गिक गोडवा आणि पौष्टिकता मात्र भरपूर आहे. हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करताना गोड खायची इच्छा झाली, तर या रेसिपीज नक्की करून पाहा!