उन्हाळा सुरू झाला आहे आणि घरातही ताजेपणा आणण्याची वेळ आली आहे. पण त्यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही. काही छोटे बदल आणि योग्य नियोजन केल्यास तुमचे घर अधिक हलके, हवेशीर आणि आकर्षक दिसू शकते. कमी खर्चात घराला समर-फ्रेंडली लुक देण्यासाठी या ५ सोप्या टिप्स उपयोगी ठरू शकतात.
१. घरातील अनावश्यक वस्तू काढा (Declutter करा)
सर्वप्रथम घरातील नको असलेल्या वस्तू बाजूला काढा. जड गालिचे, जाड पडदे, ब्लँकेट्स आणि अतिरिक्त कुशन स्टोरेजमध्ये ठेवा. जागा मोकळी ठेवल्याने घर अधिक स्वच्छ आणि हवेशीर वाटते. धूळ साफ करून डेकोरची मांडणी पुन्हा करा.
२. रंगसंगतीत बदल करा
घराचा मूड रंगांवर अवलंबून असतो. हिवाळ्यातील गडद रंगांऐवजी उन्हाळ्यात हलके आणि पेस्टल शेड्स वापरा. हलका हिरवा, स्काय ब्लू, पिवळा, पांढरा किंवा क्रीम रंग घराला उजळ आणि शांत लुक देतात. अपहोल्स्ट्री बदलताना कापूस किंवा मलमलसारख्या हलक्या कापडांची निवड करा.
३. पडद्यांमध्ये बदल करा
पडदे हे घराच्या लुकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. जड पडद्यांऐवजी हलके, पारदर्शक (sheer) पांढरे पडदे वापरल्यास घर अधिक प्रकाशमान आणि फ्रेश दिसते. यामुळे नैसर्गिक प्रकाशही चांगला मिळतो.
४. घरात हिरवळ आणा
घरात झाडे लावल्याने केवळ सजावटच नाही, तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. रबर प्लांट, स्नेक प्लांट किंवा सक्युलेंट्ससारखी कमी देखभाल लागणारी झाडे निवडा. ही झाडे हॉल, बेडरूम किंवा डायनिंग एरियात सहज ठेवता येतात.
५. फर्निचरची मांडणी बदला
उन्हाळ्यात घरात हवा खेळती राहणे महत्त्वाचे असते. त्यामुळे फर्निचरची मांडणी अशी करा की चालण्यास अधिक जागा मिळेल आणि हवा सहज फिरू शकेल. जड खुर्च्यांऐवजी हलकी फर्निचर वापरल्यास घर अधिक मोकळे वाटते.
उन्हाळ्यासाठी घर तयार करताना साधे, हलके आणि आरामदायी बदलच खरे महत्त्वाचे ठरतात. योग्य नियोजन आणि थोड्या कल्पकतेने कमी खर्चात घराला नवीन आणि ताजेतवाने रूप देता येते.