गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि लाडक्या बाप्पासाठी नेहमीच्या मोदकांपेक्षा हटके, स्पेशल आणि आकर्षक प्रसाद हवा आहे का? तर चला बनवूया रेड व्हेलवेट मोदक. चविष्ट, मोहक आणि पाहुण्यांचे लक्ष वेधून घेणारे. पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा टच देणारे हे मोदक बाप्पाला नक्कीच आवडतील.
बाहेरील आवरणासाठी (रेड व्हेलवेट मिश्रण):
मैदा – १ कप
कोको पावडर – २ टेबलस्पून
पिठीसाखर – १/२ कप
बटर – १/४ कप (रूम टेंपरेचरवर)
ताक – १/२ कप
बेकिंग पावडर – १/२ टीस्पून
बेकिंग सोडा – १/४ टीस्पून
लाल फूड कलर – १ टेबलस्पून
व्हॅनिला इसेन्स – १ टीस्पून
सारणासाठी:
क्रीम चीज – १/२ कप
पिठीसाखर – १/४ कप
व्हॅनिला इसेन्स – काही थेंब
ड्रायफ्रूट्स चिरून – २ टेबलस्पून (ऐच्छिक)
एका भांड्यात बटर आणि साखर फेटून घ्या. त्यात ताक, लाल फूड कलर आणि व्हॅनिला इसेन्स मिसळा. दुसऱ्या भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या. दोन्ही मिश्रण एकत्र करून हलके स्पॉंजी बॅटर तयार करा. हे बॅटर कपकेकसारखं १५-२० मिनिटं बेक करा. बेक झाल्यावर थंड होऊ द्या आणि चुरे करून घ्या. एका भांड्यात क्रीम चीज, पिठीसाखर आणि व्हॅनिला इसेन्स मिसळा. हवे असल्यास ड्रायफ्रूट्स घाला. रेड व्हेलवेट चुरे हाताने मळा आणि त्यात थोडे बटर किंवा कंडेन्स्ड मिल्क टाकून मऊ डो तयार करा. मोदकाच्या साच्यात रेड व्हेलवेट मिश्रण भरून मध्ये क्रीम चीज फिलिंग घाला आणि मोदकाचा आकार द्या. सर्व मोदक साच्यातून काढून प्लेटमध्ये सजवा. हवे असल्यास व्हाइट चॉकलेट किंवा थोडे ड्रायफ्रूट पावडर/सिल्व्हर वर्कने सजवा.
हे रेड व्हेलवेट मोदक दिसायला मोहक, खायला भन्नाट आणि गणपती बाप्पांसाठी एकदम हटके प्रसाद ठरतील!