Sunday special : कोळंबीप्रेमींसाठी खास ट्रीट! तंदूरशिवाय घरीच बनवा झणझणीत 'तंदूरी प्रॉन्स'

तंदूरशिवाय घरच्या घरी बनवा झणझणीत आणि स्मोकी तंदूरी प्रॉन्स. पार्टी किंवा विकेंड स्नॅक्ससाठी ही सोपी आणि चविष्ट कोळंबी रेसिपी नक्की ट्राय करा.
Sunday special : कोळंबीप्रेमींसाठी खास ट्रीट! तंदूरशिवाय घरीच बनवा झणझणीत 'तंदूरी प्रॉन्स'
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

संध्याकाळच्या पार्टीसाठी किंवा विकेंडला काहीतरी स्पेशल खायचं असेल, तर कोळंबीचा हा तंदूरी प्रकार नक्की ट्राय करा. रेस्टॉरंटमध्ये आवडीने खाल्ली जाणारी ही डिश आता अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येते. स्मोकी फ्लेवर, मसाल्यांची चव आणि रसाळ कोळंबी यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे तंदूरी प्रॉन्स.

कोळंबीला दही आणि खास मसाल्यांमध्ये मुरवून शिजवल्यामुळे तिची चव अधिकच खुलते. बाहेरून हलकी कुरकुरीत आणि आतून मऊ, रसाळ अशी ही डिश पाहुण्यांसाठी किंवा स्नॅक्स म्हणून एकदम परफेक्ट आहे. पुदिन्याची चटणी किंवा तुमच्या आवडीच्या सॉसबरोबर सर्व्ह केल्यास चव दुप्पट होते.

Sunday special : कोळंबीप्रेमींसाठी खास ट्रीट! तंदूरशिवाय घरीच बनवा झणझणीत 'तंदूरी प्रॉन्स'
उन्हामुळे जीव कासावीस होतोय? ५ मिनिटांत बनवा गारगार कैरीचं सरबत

साहित्य:

  • २५० ग्रॅम स्वच्छ केलेली कोळंबी

  • अर्धा कप घट्ट दही

  • १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट

  • १ टीस्पून लाल तिखट

  • अर्धा टीस्पून हळद

  • १ टीस्पून तंदूरी मसाला

  • अर्धा टीस्पून गरम मसाला

  • १ टीस्पून लिंबाचा रस

  • १ टीस्पून कसुरी मेथी

  • १ टेबलस्पून तेल

  • चवीनुसार मीठ

  • कांदा आणि लिंबाचे तुकडे (सर्व्ह करण्यासाठी)

कृती:

सर्वप्रथम कोळंबी स्वच्छ धुऊन त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका.

एका भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, तंदूरी मसाला, गरम मसाला, कसुरी मेथी, लिंबाचा रस, तेल आणि मीठ एकत्र करून मिक्स करा.

तयार मिश्रणात कोळंबी घालून नीट माखून घ्या आणि किमान ३० मिनिटे मुरू द्या.

ओव्हन २००°C वर प्रीहीट करा.

मॅरिनेट केलेली कोळंबी स्क्युअर्सवर लावा किंवा ट्रेवर ठेवा आणि १०–१२ मिनिटे बेक करा. मध्ये एकदा उलटून थोडं तेल लावा.

सोनेरी रंग येताच बाहेर काढा आणि कांदा-लिंबासोबत गरमागरम सर्व्ह करा.

(ओव्हन नसेल तर हीच कोळंबी तव्यावर थोडं तेल घालून शॅलो फ्राय करूनही छान लागते.)

Sunday special : कोळंबीप्रेमींसाठी खास ट्रीट! तंदूरशिवाय घरीच बनवा झणझणीत 'तंदूरी प्रॉन्स'
हॉटेलसारखे कुरकुरीत मेदूवडे आता घरीच! काही खास टिप्स आणि सोपी रेसिपी

घरच्या घरी बनवलेले हे तंदूरी प्रॉन्स चवीला इतके जबरदस्त लागतात की, एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. पुढच्या पार्टीसाठी हा स्टार्टर नक्की ठेवा!

logo
marathi.freepressjournal.in