बर्गर-पिझ्झाचा धोकादायक खेळ - पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर घाला

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झटपट मिळणारे आणि चवीला आकर्षक वाटणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ लोक जास्त प्रमाणात खाऊ लागले आहेत. पॅकेज्ड स्नॅक्स, बर्गर, पिझ्झा, फ्रोजेन फूड किंवा कोल्ड-ड्रिंक्स ही त्याची काही उदाहरणे आहेत.
बर्गर-पिझ्झाचा धोकादायक खेळ - पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर घाला
Published on

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झटपट मिळणारे आणि चवीला आकर्षक वाटणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ लोक जास्त प्रमाणात खाऊ लागले आहेत. पॅकेज्ड स्नॅक्स, बर्गर, पिझ्झा, फ्रोजेन फूड किंवा कोल्ड-ड्रिंक्स ही त्याची काही उदाहरणे आहेत. हे पदार्थ लगेच पोट भरतात, पण दीर्घकाळात आरोग्याला गंभीर नुकसान करतात. अलीकडच्या एका आंतरराष्ट्रीय अभ्यासाने तर या अन्नाचे नवे आणि धक्कादायक दुष्परिणाम उघड केले आहेत जे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात.

नवा अभ्यास काय सांगतो?

जर्नल Cell Metabolism मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात २० ते ३५ वर्षे वयोगटातील ४३ निरोगी पुरुषांचा समावेश करण्यात आला. त्यांना दोन गटांत विभागले गेले. एका गटाला तीन आठवडे अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न आणि तीन आठवडे प्रोसेस्ड न केलेले अन्न देण्यात आले. तर दुसऱ्या गटाला आवश्यकतेपेक्षा ५०० कॅलरीज जास्त अन्न खाण्यास सांगण्यात आले. या प्रयोगातून स्पष्ट झाले की, अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खाल्ल्याने वजन वाढते, चरबी साठते आणि चयापचयाच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो.

प्रजनन क्षमतेवरील परिणाम

या प्रयोगांमधून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला. अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खाल्ल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. अशा आहारामुळे शुक्राणूंची संख्या कमी होण्याची शक्यता वाढली आणि शुक्राणूंची गतिशीलताही घटली. तसेच, शुक्राणू निर्मितीसाठी महत्त्वाचा असलेला FSH (Follicle-Stimulating Hormone) कमी प्रमाणात आढळून आला.

इतर आरोग्यदायी दुष्परिणाम

  • अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नामुळे केवळ प्रजनन क्षमताच कमी होत नाही तर इतरही दुष्परिणाम दिसतात.

  • शरीराचे वजन जलद गतीने वाढते.

  • चयापचयाची (Metabolism) प्रक्रिया मंदावते.

  • सेक्स हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात.

  • स्थूलता, मधुमेह, हृदयविकार आणि हार्मोनल असंतुलनाचा धोका वाढतो.

आरोग्य टिकवायचे असेल तर अशा पदार्थांपासून शक्यतो दूर राहणे आवश्यक आहे. घरगुती आहार, ताजे फळं, भाज्या, डाळी, अंकुरित कडधान्य, सुकामेवा हे उत्तम पर्याय ठरू शकतात. गोड पदार्थांची इच्छा असल्यास खजूर, गूळ किंवा नैसर्गिक गोडाचे स्रोत वापरणे फायदेशीर ठरेल. अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न तात्पुरता आनंद देतं, पण त्याचा दीर्घकालीन परिणाम गंभीर असतो. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर आणि सेक्स हार्मोन्सवर होणारा नकारात्मक परिणाम ही त्याची सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे संतुलित आणि नैसर्गिक आहार घेणं हीच खरी गरज आहे.

(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in