Valentine's Week : जोडीदाराच्या आवडीनुसार निवडा परफेक्ट चॉकलेट; Chocolate Dayसाठी 'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट

प्रेमात गोडवा आणणाऱ्या चॉकलेटमुळे हा दिवस तरुणाईसह सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. चॉकलेट हा केवळ एक गोड पदार्थ नसून, ती प्रेम, आपुलकी, काळजी आणि भावना व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम आहे.
Valentine's Week : जोडीदाराच्या आवडीनुसार निवडा परफेक्ट चॉकलेट; Chocolate Dayसाठी 'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट
(PHOTO-YANDEX)
Published on

व्हॅलेंटाईन वीकमधील एक खास दिवस म्हणजे 'चॉकलेट डे'. दरवर्षी ९ फेब्रुवारीला साजरा होणारा हा दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. प्रेमात गोडवा आणणाऱ्या चॉकलेटमुळे हा दिवस तरुणाईसह सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. चॉकलेट हा केवळ एक गोड पदार्थ नसून, ती प्रेम, आपुलकी, काळजी आणि भावना व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम आहे.

Valentine's Week : जोडीदाराच्या आवडीनुसार निवडा परफेक्ट चॉकलेट; Chocolate Dayसाठी 'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट
सुंदर आणि निरोगी त्वचेचा मंत्र; झोपण्यापूर्वी 'अशी' घ्या त्वचेची काळजी

चॉकलेट डेच्या निमित्ताने अनेक जण आपल्या जोडीदाराला खास भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात. या खास दिवसासाठी योग्य प्रकारचं चॉकलेट निवडल्यास नात्यातील आपुलकी अधिक घट्ट होते. त्यामुळे चॉकलेट निवडताना जोडीदाराच्या आवडी-निवडी लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक प्रकारच्या चॉकलेटमागे वेगळी भावना दडलेली असते, असंही मानलं जातं.

Valentine's Week : जोडीदाराच्या आवडीनुसार निवडा परफेक्ट चॉकलेट; Chocolate Dayसाठी 'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट
Valentine's Week : फेब्रुवारीत प्रेमाचा उत्सव! कोणत्या दिवशी कोणता डे? वाचा एका क्लिकवर

आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते आजकाल अनेकांची पहिली पसंती ठरत आहे. मिल्क चॉकलेट गोड, हळवं आणि रोमँटिक प्रेम व्यक्त करण्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो. विशेषतः नव्या नात्यांमध्ये मिल्क चॉकलेट गिफ्ट करण्याची परंपरा अधिक पाहायला मिळते.

Valentine's Week : जोडीदाराच्या आवडीनुसार निवडा परफेक्ट चॉकलेट; Chocolate Dayसाठी 'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट
Valentine’s Gift Idea: गुलाब-चॉकलेट्स विसरा! वाचा Valentine’s Day साठी खास गिफ्ट आयडियाज

व्हाइट चॉकलेट साधेपणा, निरागसता आणि निखळ प्रेम दर्शवते. कमी गोड आणि क्रीमी टेक्सचरमुळे व्हाइट चॉकलेट वेगळ्या चवीचा अनुभव देतो. त्यामुळे साधं पण खास काहीतरी गिफ्ट द्यायचं असेल, तर व्हाइट चॉकलेट हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Valentine's Week : जोडीदाराच्या आवडीनुसार निवडा परफेक्ट चॉकलेट; Chocolate Dayसाठी 'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट
मैदा, साखर, मीठ...पांढरे पदार्थ आरोग्यासाठी घातक? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

आजकाल बाजारात पर्सनलाइज्ड चॉकलेट्सचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नाव, खास मेसेज, फोटो किंवा डेट कोरलेले चॉकलेट्स जोडीदारासाठी अधिक भावनिक आणि लक्षात राहणारी भेट ठरते. याशिवाय ट्रफल्स, लक्झरी चॉकलेट बॉक्स, हार्ट-शेप्ड चॉकलेट्स, हॅन्डमेड आणि आर्टिसन चॉकलेट्सनाही मोठी मागणी आहे.

Valentine's Week : जोडीदाराच्या आवडीनुसार निवडा परफेक्ट चॉकलेट; Chocolate Dayसाठी 'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट
Roasted Makhana : हेल्दी स्नॅकसाठी उत्तम पर्याय; घरी बनवा कुरकुरीत मखाना, वाचा सोपी रेसिपी

चॉकलेट डे हा केवळ गिफ्ट देण्यापुरता मर्यादित नसून, नात्यातील गोडवा जपण्याचा आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचा दिवस आहे. छोटंसं चॉकलेट आणि मनापासून दिलेलं प्रेमही जोडीदारासाठी महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे या 'चॉकलेट डे' ला महागड्या भेटवस्तूपेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात ठेवा.

logo
marathi.freepressjournal.in