मैदा, साखर, मीठ...पांढरे पदार्थ आरोग्यासाठी घातक? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

पांढऱ्या रंगाचे काही अन्नपदार्थ आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
मैदा, साखर, मीठ...पांढरे पदार्थ आरोग्यासाठी घातक? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...
(Photo-Yandex)
Published on

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत माणूस काय खातो, याकडे फारसे लक्ष देत नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारातील काही पदार्थ हळूहळू शरीराला आतून कमकुवत करत असून गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहेत. विशेषतः पांढऱ्या रंगाचे काही अन्नपदार्थ आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

मैदा, साखर, मीठ...पांढरे पदार्थ आरोग्यासाठी घातक? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...
पोटाचा घेर कमी करायचाय? रोज करा 'ही' प्रभावी योगासने

मैदा, भेसळयुक्त दूध, साखर, जास्त प्रमाणातील मीठ आणि पॉलिश तांदूळ हे पाच पांढरे पदार्थ नियमित आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होतो.

मैदा, साखर, मीठ...पांढरे पदार्थ आरोग्यासाठी घातक? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...
Sprouted Moong Salad : सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी मोड आलेल्या मुगाचे सलाड; नोट करा सोपी रेसिपी

तज्ज्ञांच्या मते, मैद्यात फायबर नसल्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि बद्धकोष्ठता, लठ्ठपणा यांसारख्या समस्या निर्माण होतात. भेसळयुक्त दूध शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडवू शकते, तर साखरेचे अति सेवन थेट शरीरातील चरबी वाढवून मधुमेहाचा धोका वाढवते.

मैदा, साखर, मीठ...पांढरे पदार्थ आरोग्यासाठी घातक? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...
हातांची बोटं मोडण्याची सवय ठरू शकते घातक; वेळीच सावध व्हा! तज्ज्ञ सांगतात...

याशिवाय, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. पॉलिश तांदळामध्ये पोषणमूल्ये कमी असून कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने वजन वाढणे, थकवा आणि जीवनसत्त्वांची कमतरता जाणवते.

मैदा, साखर, मीठ...पांढरे पदार्थ आरोग्यासाठी घातक? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...
कोरड्या त्वचेसाठी परफेक्ट केअर रुटीन; फॉलो करा 'या' टिप्स

तज्ज्ञांच्या मते, वेळेवर आहारात बदल केल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि पचनसंस्थेचे आजार टाळता येऊ शकतात.

मैदा, साखर, मीठ...पांढरे पदार्थ आरोग्यासाठी घातक? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...
डायबिटीजवर नियंत्रण ठेवायचंय? वाचा तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

मैद्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणीसारखे भरड धान्य, पॉलिश तांदळाऐवजी ब्राउन राईस, साखरेऐवजी गूळ किंवा मध यांचा मर्यादित वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे. योग्य आहार आणि जागरूकतेमुळे निरोगी जीवनशैली राखता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in