Valentine’s Week : नातं मजबूत करणारा Promise Day; जोडीदाराला द्या खास वचन

दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा हा दिवस प्रेम, विश्वास आणि नात्यांतील बांधिलकीचं प्रतीक मानला जातो. या दिवशी जोडपी एकमेकांना नातं प्रामाणिकपणे निभावण्याचं वचन देतात.
Valentine’s Week : नातं मजबूत करणारा Promise Day; जोडीदाराला द्या खास वचन
Valentine’s Week : नातं मजबूत करणारा Promise Day; जोडीदाराला द्या खास वचन
Published on

व्हॅलेंटाईन वीकमधील प्रत्येक दिवस नात्यांमधील वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यातीलच एक महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रॉमिस डे (Promise Day). दरवर्षी ११ फेब्रुवारीला साजरा होणारा हा दिवस प्रेम, विश्वास आणि नात्यांतील बांधिलकीचं प्रतीक मानला जातो. या दिवशी जोडपी एकमेकांना नातं प्रामाणिकपणे निभावण्याचं वचन देतात.

Valentine’s Week : नातं मजबूत करणारा Promise Day; जोडीदाराला द्या खास वचन
Valentine's Week : Teddy Dayचा इतिहास काय? 'टेडी' नाव पडलं तरी कसं? जाणून घ्या महत्त्व

प्रॉमिस डे साजरा करण्यामागचा उद्देश केवळ भावना व्यक्त करणं नसून, नात्याची जबाबदारी स्वीकारण्याची जाणीव करून देणं हाच आहे. प्रेमाच्या प्रवासात मतभेद, अडचणी आणि गैरसमज येऊ शकतात. अशा वेळी एकमेकांना समजून घेण्याचं, संवाद कायम ठेवण्याचं आणि कठीण प्रसंगी साथ न सोडण्याचं वचन नात्याला अधिक मजबूत करतं.

Valentine’s Week : नातं मजबूत करणारा Promise Day; जोडीदाराला द्या खास वचन
Valentine Scam Alert: व्हॅलेंटाईनच्या नावाने सायबर फ्रॉड; एक क्लिक अन् बँक खाते होईल रिकामे, वाचा महत्त्वाची माहिती

या दिवशी अनेक जण आपल्या जीवनसाथीला प्रामाणिक राहण्याचं, आदर देण्याचं, सुख-दुःखात सोबत राहण्याचं, एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा देण्याचं वचन देतात. त्याचबरोबर वेळ देणं, रागाच्या क्षणी शांतपणे संवाद साधणं आणि नात्यातील विश्वास जपणं ही वचनंही तितकीच महत्त्वाची मानली जातात.

Valentine’s Week : नातं मजबूत करणारा Promise Day; जोडीदाराला द्या खास वचन
Valentine's Week : फेब्रुवारीत प्रेमाचा उत्सव! कोणत्या दिवशी कोणता डे? वाचा एका क्लिकवर

आजच्या धावपळीच्या जीवनात नात्यांना वेळ देणं कठीण होत असलं, तरी प्रॉमिस डे नात्यांमध्ये नव्यानं बांधिलकी दृढ करण्याची संधी देतो. सोशल मीडियावर Promise Day Wishes, मेसेज आणि फोटो शेअर करून अनेकजण आपल्या भावना व्यक्त करतात. त्यामुळे प्रॉमिस डे हा केवळ प्रेमी युगुलांसाठीच नाही, तर आयुष्यभर साथ देणाऱ्या नात्यांना अधिक घट्ट करणारा खास दिवस ठरतो.

logo
marathi.freepressjournal.in