

हिवाळा सुरू होताच कपाटातला गरम कपड्यांचा खजिना बाहेर येतो. स्वेटर, मफलर, कार्डिगन, शॉल… पण हे कपडे जितके उबदार, तितकी त्यांची काळजीही वेगळी. चुकीच्या पद्धतीने धुणे, वाळवणे किंवा साठवणूक केल्यास विण सैल होते, रंग फिका होतो आणि आवडते स्वेटर लवकर खराब होतात. तुमचे हिवाळी कपडे अनेक हंगामात नवे दिसावेत, यासाठी काही सोप्या आणि उपयोगी टिप्स…
स्वेटर थेट मशीनमध्ये टाकू नका; विण ताणते आणि आकार बिघडतो
कोमट पाण्यात हाताने हलक्या हाताने धुवा
सौम्य लिक्विड डिटर्जंटच वापरा
जोरात पिळल्याने फायबर सैल होतात
स्वच्छ टॉवेलवर स्वेटर ठेवून हलक्या दाबाने पाणी काढा
टॉवेलच्याच आधाराने वाळवायला ठेवा
उन्हात ठेवल्यास रंग फिकट होतो आणि धागा कडक होतो
सावलीत, वाऱ्याच्या जागीच वाळवा
ड्रायरचा वापर टाळा
हॅंगरवर टांगल्यास स्वेटर लांबतो
नीट फोल्ड करून कपाटात ठेवा
नॅप्थलीन किंवा कपड्यांसाठी देठी ठेवल्यास कीटकांपासून संरक्षण
स्वेटरवर आलेले छोटे गोळे ओढल्यास अधिक खराब होतात
फॅब्रिक शेव्हर वापरा किंवा कात्रीने हलक्या हाताने कापा
संवेदनशील धागे असल्याने वेगवेगळ्या रंगांचे मफलर वेगळे धुवा
रोल करून साठवा, क्रिजेस पडत नाहीत
‘वूल शैम्पू’ किंवा ‘स्वेटर वॉश’ वापरा
आठवड्यातून एकदाच धुवा. जास्त धुण्याने लोकर खराब होते
थोडी काळजी, योग्य स्टोरेज आणि व्यवस्थित धुण्याची पद्धत पाळली, तर तुमचे आवडते स्वेटर आणि मफलर वर्षानुवर्षे नवे दिसतील आणि हिवाळ्यातील स्टाइलही टिकून राहील.