महिलांनो, तिशीनंतरही दिसायचंय फिट आणि तरुण? आहारात समाविष्ट करा 'हे' विटामिनयुक्त पदार्थ

तिशीनंतरही फिट, तरुण आणि चमकदार दिसायचं असेल तर महिलांनी आहारात काही खास विटामिनयुक्त पदार्थांचा समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. हे पदार्थ शरीराला आतून ताकद देतात आणि त्वचेची चमकही टिकवून ठेवतात… जाणून घ्या कोणते आहेत हे खास पदार्थ.
महिलांनो, तिशीनंतरही दिसायचंय फिट आणि तरुण? आहारात समाविष्ट करा 'हे' विटामिनयुक्त पदार्थ
महिलांनो, तिशीनंतरही दिसायचंय फिट आणि तरुण? आहारात समाविष्ट करा 'हे' विटामिनयुक्त पदार्थ'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक महिला घर, ऑफिस आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देऊ शकत नाहीत. दिवसभराच्या कामामुळे थकवा, ताण आणि अनियमित आहार याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. विशेषतः वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात काही नैसर्गिक बदल होऊ लागतात. त्यामुळे या काळात आरोग्य आणि आहाराबाबत अधिक सजग राहणे आवश्यक ठरते.

वय वाढू लागल्यावर शरीरातील कोलेजनचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा किंवा त्वचा सैल पडण्यासारख्या समस्या दिसू शकतात. अनेकदा कामाच्या व्यापात या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. मात्र त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी आणि तरुणपणा कायम राखण्यासाठी आहारात काही पौष्टिक घटकांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

महिलांनो, तिशीनंतरही दिसायचंय फिट आणि तरुण? आहारात समाविष्ट करा 'हे' विटामिनयुक्त पदार्थ
काय तर म्हणे, उन्हात ठेवलेलं पाणी प्यायल्याने व्हिटामिन D मिळतं; डॉक्टरांकडून व्हायरल दाव्याचं खंडन, म्हणाले...

प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

कोलेजनचे प्रमाण वाढवण्यासाठी शरीराला पुरेसे प्रोटीन मिळणे आवश्यक आहे. पनीर, दही, मूगडाळ, राजमा, चणे, सोयाबीन आणि टोफू यांसारख्या पदार्थांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. तसेच ड्रायफ्रूट्स आणि विविध प्रकारचे नट्स देखील शरीरासाठी उपयुक्त मानले जातात. जंक फूडऐवजी घरगुती आणि संतुलित आहार घेणे अधिक चांगले ठरते.

झिंक आणि बायोटिनचे महत्त्व

त्वचा, केस आणि नखांचे आरोग्य टिकवण्यासाठी झिंक आणि बायोटिन हे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरात झिंकची कमतरता असल्यास केस गळणे, नख कमकुवत होणे किंवा त्वचेवर डाग दिसणे अशा समस्या उद्भवू शकतात. बदाम, भोपळ्याच्या बिया, तीळ, मशरूम आणि अंड्याचा पांढरा भाग हे झिंकचे उत्तम स्रोत मानले जातात.

महिलांनो, तिशीनंतरही दिसायचंय फिट आणि तरुण? आहारात समाविष्ट करा 'हे' विटामिनयुक्त पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा हिरवा खजिना; पुदिन्याचा आहारात 'असा' करा समावेश

ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड फायदेशीर

काही महिलांना वयानुसार सांधेदुखी किंवा हाडांमध्ये वेदना जाणवू लागतात. अशा समस्या कमी करण्यासाठी आहारात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करणे उपयुक्त ठरते. अळशीचे बी, चिया सीड्स, अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बिया हे त्याचे चांगले स्रोत आहेत.

विटामिन सीने वाढते प्रतिकारशक्ती

शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी विटामिन सी असलेले पदार्थ नियमितपणे खाणे आवश्यक आहे. संत्री, लिंबू, आवळा आणि इतर सिट्रस फळांमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळते. हे घटक त्वचेची चमक टिकवण्यास आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले हे केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची नवशक्ति पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in