World No Tobacco Day : तंबाखू आरोग्यासाठी धोकादायक; व्यसन कमी करण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक टिप्स

महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान तंबाखू सेवन केल्यास अकाली प्रसूती, बाळांमध्ये जन्मदोष आणि प्रजननासंबंधी समस्या उद्भवू शकतात.
World No Tobacco Day : तंबाखू आरोग्यासाठी धोकादायक; व्यसन कमी करण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक टिप्स
World No Tobacco Day : तंबाखू आरोग्यासाठी धोकादायक; व्यसन कमी करण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक टिप्स'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

तंबाखूचे व्यसन एकदा लागले की ते सोडणे अनेकांसाठी कठीण ठरते. मात्र, तंबाखूचे सेवन दीर्घकाळ आरोग्यावर गंभीर परिणाम करते. दरवर्षी ३१ मे रोजी 'जागतिक तंबाखूमुक्त दिन' साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश तंबाखूमुळे होणाऱ्या धोक्यांविषयी जनजागृती करणे हा आहे.

सिगारेट, सिगार, गुटखा, पानातील तंबाखू आणि जर्दा यांसारख्या धूम्रपान आणि धूम्रपानरहित पदार्थांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. भारतात दरवर्षी १३ लाखांहून अधिक मृत्यू तंबाखू सेवनामुळे होत असल्याचे सांगितले जाते.

World No Tobacco Day : तंबाखू आरोग्यासाठी धोकादायक; व्यसन कमी करण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक टिप्स
चहा-कॉफीऐवजी सकाळी प्या नारळपाणी; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

तंबाखूमुळे होणारे गंभीर आजार

तंबाखूमुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसांचा आणि मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. याशिवाय हृदयविकार आणि Chronic Obstructive Pulmonary Disease (COPD) सारख्या फुफ्फुसांच्या आजारांचाही धोका निर्माण होतो.

महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान तंबाखू सेवन केल्यास अकाली प्रसूती, बाळांमध्ये जन्मदोष आणि प्रजननासंबंधी समस्या उद्भवू शकतात. तसेच दात खराब होणे, हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या समस्या वाढू शकतात. सेकंडहँड स्मोकिंगमुळेही श्वसन आणि हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढतो.

World No Tobacco Day : तंबाखू आरोग्यासाठी धोकादायक; व्यसन कमी करण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक टिप्स
Summer Tips : वाढत्या तापमानात 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

आयुर्वेदानुसार तंबाखू का घातक?

आयुर्वेदानुसार तंबाखू हे शरीरासाठी विषासारखी मानली जाते. यामुळे वात आणि पित्त दोष बिघडतात, तसेच कफ वाढून फुफ्फुसांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळेत तंबाखूचे व्यसन सोडणे गरजेचे आहे.

तंबाखूचे व्यसन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

१. हर्बल उपायांचा आधार घ्या

ओवा चघळल्याने निकोटीनची इच्छा कमी होण्यास मदत होते. ज्येष्ठमध तोंडाची सवय नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. दालचिनीच्या काड्या चघळल्याने धूम्रपानाची इच्छा कमी होण्यास मदत होते. तुळशीची पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते.

रात्री कोमट त्रिफळा पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होऊ शकते. ब्राह्मी आणि जटामांसी यांसारख्या औषधी वनस्पतींचा चहामध्ये वापर केल्यास तंबाखूची सवय कमी करण्यास मदत मिळू शकते.

World No Tobacco Day : तंबाखू आरोग्यासाठी धोकादायक; व्यसन कमी करण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक टिप्स
थकवा, पिंपल्स आणि मूड स्विंग्स वाढलेत? 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर

२. आहारात करा बदल

फळे, भाज्या आणि ड्रायफ्रूट्स यांसारखे अल्कलाइन पदार्थ खाल्ल्याने तंबाखूची इच्छा कमी होऊ शकते. सात्त्विक आहार घेतल्याने शरीर आणि मन शुद्ध राहण्यास मदत होते.

आले, तुळस आणि ज्येष्ठमध यांचे हर्बल पेय फुफ्फुस स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. मधासोबत मुळ्याचा रस घेतल्याने धूम्रपान सोडण्यास मदत होऊ शकते. तसेच कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

३. जीवनशैलीत बदल करा

प्राणायाम आणि योगामुळे फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यास मदत होते. ध्यान आणि योगासनांमुळे ताण कमी होतो आणि व्यसनमुक्ती प्रक्रियेत मानसिक आधार मिळतो. पंचकर्म उपचार शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त मानले जातात.

logo
marathi.freepressjournal.in