World Thalassaemia Day 2026 : थॅलेसेमिया म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय

थॅलेसेमिया म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि आयुर्वेदाच्या मदतीने त्याचे व्यवस्थापन कसे करता येते, याबद्दल जाणून घेऊया.
World Thalassaemia Day 2026 : थॅलेसेमिया म्हणजे काय?  जाणून घ्या लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय
World Thalassaemia Day 2026 : थॅलेसेमिया म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

भारतामध्ये थॅलेसेमिया या आनुवंशिक रक्तविकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. जगातील सर्वाधिक थॅलेसेमिया रुग्ण भारतात असून सुमारे एक लाखांहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत. तसेच देशात ३.५ ते ४.५ कोटी बीटा-थॅलेसेमिया कॅरिअर्स असल्याचे मानले जाते. दरवर्षी ८ मे रोजी 'जागतिक थॅलेसेमिया दिन' साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश या गंभीर रक्तविकाराबाबत जनजागृती करणे आणि या आजारामुळे जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करणे हा आहे. थॅलेसेमिया म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि आयुर्वेदाच्या मदतीने त्याचे व्यवस्थापन कसे करता येते, याबद्दल जाणून घेऊया.

थॅलेसेमिया म्हणजे काय?

थॅलेसेमिया हा आनुवंशिक रक्तविकार आहे. शरीरात हिमोग्लोबिनचे उत्पादन कमी झाल्याने हा आजार होतो. या आजारामुळे रुग्णांना अशक्तपणा, सतत थकवा जाणवणे, वाढ खुंटणे, प्लीहा, हृदय किंवा यकृत सूजणे, गडद रंगाची लघवी, हाडांचे विकार आणि शरीरात जास्त प्रमाणात लोह साचल्यामुळे अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होतो. आई-वडिलांपैकी एक किंवा दोघेही कॅरिअर किंवा रुग्ण असल्यास मुलांना हा आजार होण्याची शक्यता वाढते.

World Thalassaemia Day 2026 : थॅलेसेमिया म्हणजे काय?  जाणून घ्या लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय
Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 'हे' ५ पदार्थ खा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

थॅलेसेमियाचे प्रकार

थॅलेसेमियाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत.

  • अल्फा थॅलेसेमिया - अल्फा ग्लोबिन जनुकांशी संबंधित

  • बीटा थॅलेसेमिया - बीटा ग्लोबिन जनुकांशी संबंधित

बीटा थॅलेसेमियाचे पुढील प्रकार पडतात:

  • थॅलेसेमिया मेजर

  • थॅलेसेमिया इंटरमिडिया

  • थॅलेसेमिया मायनर

रुग्णांच्या प्रकृतीनुसार नियमित रक्त चढवणे, शरीरातील अतिरिक्त लोह कमी करण्यासाठी आयर्न केलेशन थेरपी आणि काही प्रकरणांमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट यांसारखे उपचार केले जातात.

आयुर्वेदानुसार थॅलेसेमिया

आयुर्वेदानुसार थॅलेसेमिया हा ‘बीज दोषा’मुळे होणारा विकार मानला जातो. या आजारावर पूर्ण उपचार नसले तरी योग्य उपचार आणि जीवनशैलीच्या मदतीने त्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. रक्त चढवण्याची गरज कमी करणे, रक्ताची गुणवत्ता सुधारणे आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे यासाठी आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरू शकतात.

World Thalassaemia Day 2026 : थॅलेसेमिया म्हणजे काय?  जाणून घ्या लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय
‘टाइप-१’ मधुमेहावर प्रभावी ठरणार ‘जीन थेरपी’; एका इंजेक्शनने आजार बरा होण्याचा अंदाज

थॅलेसेमियासाठी आयुर्वेदिक उपाय

हर्बल उपाय

  • अश्वगंधा : शरीराची प्रतिकारशक्ती आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करते.

  • आवळा : व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने लोहामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यास मदत होते.

  • गिलोय : तणाव कमी करून लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवण्यास सहाय्यक.

  • त्रिफळा : शरीरातील अतिरिक्त लोह कमी करण्याचे कार्य करते.

आहारात काय घ्यावे?

  • जास्त लोह असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात घ्यावेत.

  • नारळ, स्ट्रॉबेरीसारखे थंड आणि गोड गुणधर्माचे पदार्थ यकृतासाठी फायदेशीर ठरतात.

  • भरपूर पाणी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खावीत.

  • हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

जीवनशैलीत 'या' गोष्टी महत्त्वाच्या

  • अतिश्रम टाळावेत.

  • हलका व्यायाम, योगासने, पोहणे आणि चालणे यांचा समावेश करावा.

  • संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्यावी.

  • मद्यपान, धूम्रपान आणि व्यसनांपासून दूर राहावे.

उपचारांबाबत घ्यायची काळजी

थॅलेसेमिया रुग्णांनी नियमित डॉक्टरांचा सल्ला, तपासण्या आणि रक्त संक्रमण वेळेवर करून घेणे आवश्यक आहे. शरीरातील लोहाचे प्रमाण सातत्याने तपासणेही गरजेचे असते. तसेच थकवा नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेशी विश्रांती आणि नियोजित दिनचर्या महत्त्वाची ठरते.

(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in