Nagpur : बायकोच्या आत्महत्येनंतर नवऱ्याने घेतला गळफास; आईचाही आत्महत्येचा प्रयत्न, नक्की काय घडलं?

बायकोच्या आत्महत्येनंतर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झालेल्या नवऱ्याने नागपूरमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्याच्या आईची प्रकृती सध्या गंभीर आहे.
Nagpur : बायकोच्या आत्महत्येनंतर नवऱ्याने घेतला गळफास; आईचाही आत्महत्येचा प्रयत्न, नक्की काय घडलं?
Nagpur : बायकोच्या आत्महत्येनंतर नवऱ्याने घेतला गळफास; आईचाही आत्महत्येचा प्रयत्न, नक्की काय घडलं?
Published on

बंगळुरू येथून महाराष्ट्रातील नागपूरपर्यंत तब्बल हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रवासात त्याच्यासोबत असलेल्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिची प्रकृती गंभीर आहे.

मृत व्यक्तीचे नाव सूरज शिवण्णा (वय ३६) असे असून, अवघ्या दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी गणवी (वय २६) हिने बंगळुरूमध्ये आत्महत्या केली होती. पत्नीच्या मृत्यूनंतर सूरजवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेमके काय घडले?

सूरज आणि गणवी यांचे लग्न २९ ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये झाले होते. लग्नानंतर दोघे श्रीलंकेला हनिमूनसाठी गेले होते. मात्र, दोघांमध्ये वाद झाल्याने हा प्रवास अर्धवट सोडून ते भारतात परतले.

गणवीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, सासरकडून तिला अपमान आणि नकारात्मक वागणूक मिळत होती. त्यामुळे तिला माहेरी आणण्यात आले होते. मंगळवारी गणवीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र ब्रेन डेड झाल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. गुरुवारी तिचा मृत्यू झाला.

यानंतर गणवीच्या पालकांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात हुंडाबळी आणि मानसिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर बंगळुरूमध्ये सूरजच्या घराबाहेर आंदोलनही करण्यात आले होते.

Nagpur : बायकोच्या आत्महत्येनंतर नवऱ्याने घेतला गळफास; आईचाही आत्महत्येचा प्रयत्न, नक्की काय घडलं?
तेराव्याच्या जेवणातील रायता खाणं पडलं महागात; रेबीजच्या भीतीने गावकरी रुग्णालयात, नेमकं काय घडलं?

नागपूरमध्ये दुर्दैवी अंत

या पार्श्वभूमीवर, सूरज आणि त्याची आई जयंती शिवण्णा हे दोघे बंगळुरू येथून नागपूर येथे आले. नागपूरमधील वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये मध्यरात्री सूरजने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती सूरजचा भाऊ संजय शिवण्णा याने नागपूर पोलिसांना दिली. आत्महत्येचा प्रयत्न करताना सूरजची आईही गंभीर जखमी झाली असून ती सध्या रुग्णालयात आहे.

Nagpur : बायकोच्या आत्महत्येनंतर नवऱ्याने घेतला गळफास; आईचाही आत्महत्येचा प्रयत्न, नक्की काय घडलं?
लिबर्टी शोरूमने तुटलेल्या चप्पलीची वॉरंटी नाकारली; वाद थेट कोर्टात, मॅनेजरला होणार अटक

पोलिस तपास सुरू

सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून सुरू आहे. बंगळुरूमधील तक्रार आणि नागपूरमधील आत्महत्येचा संदर्भ लक्षात घेऊन दोन्ही राज्यांतील यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in