भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित

रोहा येथून पुढे मुंढरीपर्यंत जाण्यासाठी बसमध्ये या दोन विद्यार्थिनींशिवाय अन्य कोणताही प्रवासी नव्हता. त्यामुळे...
भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित
भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित(Photo- X/@airnews_mumbai)
Published on: 

भंडारा : प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाच्या कारभाराचा संतापजनक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. भंडारा ते मुंढरी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना चालक आणि वाहकाने रात्रीच्या अंधारात रोहा गावातच उतरवल्याची घटना घडली. बसमध्ये पुढील प्रवासासाठी अन्य प्रवासी नसल्याचे कारण देत मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित चालक आणि वाहकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी भंडारा आगाराची एमएच ४० वाय ५००८ क्रमांकाची बस भंडारा येथून मुंढरी गावाकडे जात होती. रात्रीच्या सुमारास बस रोहा गावात पोहोचली. मात्र, रोहा येथून पुढे मुंढरीपर्यंत जाण्यासाठी बसमध्ये या दोन विद्यार्थिनींशिवाय अन्य कोणताही प्रवासी नव्हता. त्यामुळे चालक आणि वाहकाने दोन्ही विद्यार्थिनींना पुढील प्रवास घडवून आणण्याऐवजी रोहा गावातच उतरवले. रात्रीच्या अंधारात मुलींना वाटेतच सोडल्याने या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित
Mumbai : रॅपिडो, ओला, उबर चालकांची काटेकोर तपासणी करा; परिवहन मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश, सुधारित कायद्याचाही विचार

या घटनेची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांना मिळाली. त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून तातडीने रोहा गाव गाठले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी संबंधित चालक आणि वाहकाला जाब विचारला. तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केली आणि कठोर कारवाईची मागणी केली. पालक आणि शिक्षण सभापती वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने मुलींना मदत मिळाली. मात्र, या घटनेमुळे रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

चौकशीनंतर चालक-वाहक निलंबित

या घटनेचे वृत्त स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाल्यानंतर एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांच्या निर्देशानुसार महामंडळाच्या प्रशासनाने प्राथमिक चौकशी केली. भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांनी केलेल्या चौकशीत चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांना या प्रकरणासाठी जबाबदार ठरवण्यात आले. त्यानंतर दोघांनाही आजपासून (१६ नोव्हेंबर) निलंबित करण्यात आले आहे. तसेच महामंडळाच्या नियमानुसार त्यांच्याविरोधात पुढील शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.

भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित
Mumbai : पुनर्वसन घरे जप्त करा; उच्च न्यायालयाचे SRA ला आदेश, कचरा टाकणाऱ्या झोपडीधारकांना इशारा

महिला, मुलांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे स्पष्ट करत प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी एसटी कर्मचाऱ्यांनी पार पाडली पाहिजे. बसमधून प्रवास करणाऱ्या मुलांकडे स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देणारे परिपत्रक तातडीने जारी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित
Mumbai : बेस्टच्या ताफ्यात १,५०० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या! मार्च २०२७ पर्यंत २२५ बस दाखल होणार

महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही सरनाईक यांनी दिला. भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर नोकरीतून बडतर्फ करण्यासह कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)