Pune By-Election : पुणे पोटनिवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने; संजय राऊत म्हणतात...

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा दोनही मतदारसंघावर केला दावा, (Pune By-Election) महाविकास आघाडीच्या बैठकीत होणार निर्णय, तारखांमध्येही केले बदल
Pune By-Election : पुणे पोटनिवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने; संजय राऊत म्हणतात...

केंद्रीय निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आणि प्रत्येक घटक पक्षात चढाओढ सुरु झाली. काही दिवसांपूर्वी कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निशाण झाले. त्यानंतर ही पोटनिवडणूक लावण्यात आली.

हेही वाचा :

Mukta Tilak : कर्करोगाशी दोन हात करताना कर्तव्य बजावणाऱ्या मुक्ता टिळक यांचे निधन

मात्र, भाजपने या दोनही जागेवर बिनविरोध निवडणूक व्हावी अशी मागणी केली होती. यावरून महाविकास आघाडीने नकार देत ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. पण, कोणता पक्ष कोणती निवडणूक लढवणार? यामध्ये महाविकास आघाडीत मतभिन्नता असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा :

MLA Laxman Jagtap passed away : पिंपरी-चिंचवडचे आमदार भाजपचे लक्ष्मण जगताप यांचे निधन

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले की, "पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये पिंपरी चिंचवडची जागा ही शिवसेनेने आणि कसबा पेठ मतदारसंघाची जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने लढवावी, अशी आमची भूमिका आहे असे सांगितले आहे." अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची मात्र अडचण होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही जागा लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. यावर पुन्हा एकदा बैठक होऊन, यामध्ये काय निर्णय होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

Kasaba By-Election : कसबा पोटनिवडणुकीची जागा शिवसेनेला द्या; राष्ट्रवादीकडे केली मागणी

दरम्यान, पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या निवडणुकांची तारीख बदलण्यात आली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. याआधी २७ फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू येथील निवडणुकीसोबतच या पोटनिवडणुका होणार होत्या. मात्र, १२वीच्या परीक्षा असल्यामुळे आता या निवडणुका एक दिवस अहंडीचं म्हणजे २६ फेब्रुवारीला होणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in