बारसू आंदोलनावरून मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक गावकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले असून राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे
बारसू आंदोलनावरून मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आज बारसू येथे पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद पाहायला मिळाला. आज बारसूमधील माळरानावर प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरु असताना हजारो स्थानिकांनी तिकडे जाऊन प्रकल्पाचा तीव्र विरोध केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर केला. तर भर उन्हामध्ये माळरानावर झालेल्या या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांना उष्णतेचा त्रास झाला. यावरून विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनावर आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईवर भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "हे सरकार स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प पुढे घेऊन जाणार नाही. प्रकल्पाला ७० टक्केपेक्षा अधिक लोकांचे समर्थन दिले आहे." असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

बारसूमध्ये पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक; एकीकडे सर्वेक्षण तर दुसरीकडे आंदोलक आक्रमक

तसेच, आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचेदेखील आरोप होत होते, यावर मुख्यमंत्री शिंदेंनी कुठलाही लाठीचार्ज झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता त्याठिकाणी शांतता असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी माहिती दिली.

हेही वाचा :

बारसू आंदोलन चिघळणार? पोलिसांनी घेतले विनायक राऊतांना ताब्यात; उदय सामंतांचा इशारा

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, "बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत मी स्वत: उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी आणि तेथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली आहे. त्याठिकाणी कोणताही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही. आंदोलनस्थळी काही लोक स्थानिक होते, पण काही जण बाहेरचे असल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय किंवा जबरदस्ती करुन हा प्रकल्प लादला जाणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in