दुधाची तहान ‘पिशवी’वर; सुट्या पिशवीतून दूधविक्रीला FDA ची बंदी, ...अन्यथा होणार ३ लाखांचा दंड

तुमच्या घरात नेहमीचा ‘दूधवाला’ आता सकाळी तुमच्या घराची बेल वाजवणार नाही. कारण, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सुट्या दुधाच्या विक्रीवर तातडीने बंदी घातली आहे.
दुधाची तहान ‘पिशवी’वर; सुट्या पिशवीतून दूधविक्रीला FDA ची बंदी, ...अन्यथा होणार ३ लाखांचा दंड
दुधाची तहान ‘पिशवी’वर; सुट्या पिशवीतून दूधविक्रीला FDA ची बंदी, ...अन्यथा होणार ३ लाखांचा दंड'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

एस. बालकृष्णन, अमित श्रीवास्तव/मुंबई

तुमच्या घरात नेहमीचा ‘दूधवाला’ आता सकाळी तुमच्या घराची बेल वाजवणार नाही. कारण, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सुट्या दुधाच्या विक्रीवर तातडीने बंदी घातली आहे.

पिढ्यानपिढ्या हजारो दूधवाले लाखो घरांमध्ये दूध पोहोचवत होते. चेंबूरमधील दूध विक्रेते राजमणी पाल म्हणाले की, ‘मी दुकान बंद केले आहे. माझे कर्मचारी आता बेरोजगार होतील. माझ्यासारखी शेकडो दुकाने बंद झाली आहेत कारण सुटे दूध विकल्यास ३ लाख रुपयांचा दंड आहे. यामुळे हजारो लोक बेरोजगार होतील.’

दुधाची तहान ‘पिशवी’वर; सुट्या पिशवीतून दूधविक्रीला FDA ची बंदी, ...अन्यथा होणार ३ लाखांचा दंड
अन्नभेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका; वसई-विरारमध्ये १८ दुकाने सील, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त

याबाबत मुंढे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु, ‘फ्री प्रेस जर्नल’कडे त्यांच्या ३ जुलै २०२६ च्या आदेशाची प्रत आहे, ज्यात म्हटले आहे की, ‘एफडीएने केलेल्या तपासणीत संपूर्ण डेअरी पुरवठा साखळीत नियमांचे व्यापक आणि सातत्यपूर्ण उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.’ तसेच, ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने केलेल्या राष्ट्रीय दूध सुरक्षा आणि गुणवत्ता सर्वेक्षणात असे आढळून की, दुधातील भेसळ, विशेषतः दूषित पशुखाद्यामुळे होणारे ‘अफलाटॉक्सिन एम १’ आणि अँटीबायोटिक्सचे अंश, ही जनतेच्या आरोग्यासाठी गंभीर चिंतेची बाब आहे.

अंधेरीतील एका किरकोळ विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘दूध पॅकेजिंग प्लांट उभारण्यासाठी १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल. आम्ही एवढे पैसे कुठून आणणार? अनेक दशकांपासून माझे कुटुंब दूध विक्रीच्या व्यवसायात आहे आणि आजपर्यंत आमच्या ग्राहकांकडून एकही तक्रार आलेली नाही.’

दुधाची तहान ‘पिशवी’वर; सुट्या पिशवीतून दूधविक्रीला FDA ची बंदी, ...अन्यथा होणार ३ लाखांचा दंड
गुटखा माफियांवर आता ‘मकोका’ लागणार; अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

गोरेगावचे रहिवासी के. आदिश्री म्हणाले, ‘इतकी वर्षे आम्ही ‘भैया’ने आणलेले दूध तापवून वापरत आहोत. आजपर्यंत काहीच अडचण आलेली नाही. पॅकबंद दूध महाग पडेल.’

ठाणे शहर दूध व्यावसायिक सहकारी सोसायटीचे सचिव बाबू चोडणकर यांनी सांगितले की, एफडीए अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना शुक्रवारपासून सुट्या दुधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नसल्याचे कळवले होते. शुक्रवारपासून सुट्या दुधाची विक्री करणारी सर्व दुकाने आणि होम डिलिव्हरी पूर्णपणे बंद झाली आहे. कॅनमध्ये दूध साठवणे आणि विकणे आता चालू ठेवता येणार नाही.’

या निर्णयाचा सर्वाधिक फटका मिठाईची दुकाने आणि आईस्क्रीम पार्लर यांसारख्या मोठ्या प्रमाणावर दूध वापरणाऱ्या ग्राहकांना बसेल, असे त्यांनी सांगितले.

‘घरगुती ग्राहक पॅकबंद दूध खरेदी करून भागवून घेतील. पण मिठाईची दुकाने आणि आईस्क्रीम पार्लर सुट्या दुधाच्या पुरवठ्यावर अवलंबून होते, कारण त्यांच्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे सोपे होते आणि ते पॅकबंद दुधापेक्षा २ ते ४ रुपयांनी स्वस्तही होते,’ असे त्यांनी पुढे सांगितले.

मुंबईला दररोज सुमारे ५० लाख लिटर दुधाची गरज असते, तर मुंबई महानगर क्षेत्राची दैनंदिन मागणी जवळपास ६० लाख लिटर आहे. दूध व्यावसायिकांचे सल्लागार राम पाटील यांच्या मते, या क्षेत्रातील दुधाच्या एकूण पुरवठ्यापैकी किमान ३५ टक्के पुरवठा हा सुटे दूध विकणारे घाऊक आणि किरकोळ व्यापारी करतात. मुंबईला विविध दुधाचा पुरवठा होतो. चोडणकर यांच्या मते, सर्वाधिक पुरवठा कोल्हापूरमधून होतो आणि सुट्या दुधाचे मोठे घाऊक व किरकोळ व्यापारी याच जिल्ह्यातून दूध मागवतात.

खर्च वाढणार

सुट्या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या लहान किरकोळ विक्रेत्यांना पॅकेजिंग युनिट्स उभारून पॅकबंद दुधाची विक्री सुरू केल्यासच आपला व्यवसाय पुढे चालू ठेवता येईल. मात्र, हा बदल अत्यंत खर्चिक असण्याची शक्यता आहे. आदेशात नमूद केले की, ‘पाश्चराइज्ड, स्टँडर्डाइज्ड आणि इतर सर्व प्रकारच्या हीट-ट्रीटेड दुधाची विक्री केवळ सीलबंद, टॅम्पर-एव्हिडंट आणि रीतसर लेबल असलेल्या पॅकेटमध्येच केली पाहिजे.’

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in