
मुंबई : अडीच कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना महिना १,५०० रुपये देण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यात महायुतीची दमछाक होत आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना अर्जांची छाननी करत अपात्र ठरवले जात आहे.
ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्या बहिणींचा शोध सुरू असून केंद्र सरकारच्या प्राप्रिकर विभागाचा अहवाल आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एक कोटीहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरतील, असे महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.