नसरापूर प्रकरण : खटल्याचा निकाल २९ जून रोजी

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
नसरापूर प्रकरण : खटल्याचा निकाल २९ जून रोजी
नसरापूर प्रकरण : खटल्याचा निकाल २९ जून रोजी
Published on

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला असून, आरोपीला नेमकी काय शिक्षा द्यायची याचा फैसला येत्या सोमवारी २९ जून रोजी होणार आहे. बंद दाराआड झालेल्या या खटल्यात सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

नसरापूर प्रकरण : खटल्याचा निकाल २९ जून रोजी
'फी भरली नाही' म्हणून मित्र-मैत्रिणींसमोर अपमान; १७ वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, मृत्यूपूर्वीचा Video व्हायरल, शिक्षकांविरोधात गुन्हा

न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर जेव्हा न्यायाधीशांनी आरोपीला शिक्षेबाबत मत विचारले, तेव्हा त्याने अपघाताचा खोटा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय अहवाल आणि पुराव्यांनी त्याचे हे म्हणणे खोडून काढले. विशेष सरकारी वकील विपुल दुशिंग यांनी मांडलेल्या पुराव्यांनुसार, आरोपीने चिमुरडीवर ३९ मिनिटे अत्याचार केले होते आणि तिच्या शरीरावर १८ जखमा होत्या. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी, पोटेन्सी रिपोर्टनुसार तो हे कृत्य करण्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत १२०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करून या प्रकरणात तत्परता दाखवली आहे. ५५ पेक्षा जास्त साक्षीदार, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि डीएनए चाचणी यांसारख्या ठोस पुराव्यांमुळे अवघ्या पावणेदोन महिन्यांत खटला निकालाच्या टप्प्यावर पोहोचला. आरोपीच्या या अमानवी कृत्यामुळे त्याचे कुटुंब आणि गावकऱ्यांनीही त्याला नाकारले असून, आता न्यायव्यवस्था त्याला काय शिक्षा सुनावते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in