Pune : फिजिक्सच्या प्रश्नांसाठी मोजले २० लाख? NEET प्रकरणी आणखी दोघांना अटक

देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट-युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून भौतिकशास्त्राचे शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह आणि लातूरमधून डॉ. मनोज शिरुरे अशा दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Pune : फिजिक्सच्या प्रश्नांसाठी मोजले २० लाख? NEET प्रकरणी आणखी दोघांना अटक
Pune : फिजिक्सच्या प्रश्नांसाठी मोजले २० लाख? NEET प्रकरणी आणखी दोघांना अटकप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट-युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून भौतिकशास्त्राचे शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह आणि लातूरमधून डॉ. मनोज शिरुरे अशा दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तेजस शाह याने आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून नीट युजी २०२६ परीक्षेतील फिजिक्स विषयाचे फुटलेले प्रश्न २० लाख रुपयांना विकत घेतल्याचा प्राथमिक संशय आहे.

या ताज्या अटकेनंतर या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. तेजस शहा हा गेल्या १४ वर्षांपासून पुण्यातील नामांकित पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल ॲकॅडमीमध्ये भौतिकशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करत होता. मनीषाने आपल्या मोबाईलमध्ये तेजसचा नंबर गॉड या नावाने सेव्ह केला होता.

सीबीआयने या संदर्भात तेजस शाहच्या मोबाईलमधील चॅट्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ही कारवाई केली आहे. सीबीआयच्या पथकाने डॉ. अभंग प्रभू मेडिकल ॲकॅडमीच्या कार्यालयावर धाड टाकून तेजस शहाच्या केबिनची कसून तपासणी केली. तो या संस्थेत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होता, त्या केबिनमधून अनेक महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. सीबीआयने कारवाईदरम्यान तेजस शहाचे मोबाईल, टॅब, लॅपटॉप आणि त्यातील हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. त्याच्या केबिनमध्ये एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेच्या काही पावत्याही सापडल्या असून, त्याद्वारे झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे.

Pune : फिजिक्सच्या प्रश्नांसाठी मोजले २० लाख? NEET प्रकरणी आणखी दोघांना अटक
NEET घोटाळ्याचे नवे महाराष्ट्र कनेक्शन; कुलकर्णीपाठोपाठ पुण्याच्या प्रा. मनीषा मांढरेला अटक

दरम्यान, अकॅडमीचे संचालक सचिन हळदवणेकर यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, तेजस शाह हा एक कनिष्ठ शिक्षक असून त्याने वैयक्तिक पातळीवर हे कृत्य केले आहे. यात संस्थेचा कोणताही संबंध नाही. शाह याला पुण्याच्या न्यायालयात हजर केल्यानंतर आता दिल्लीतील सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दुसरीकडे, लातूरमधून अटक करण्यात आलेला डॉ. मनोज शिरुरे हा पेशाने डॉक्टर असून त्याने एका कोचिंग सेंटरच्या मालकाच्या मुलाला आणि इतर दोन विद्यार्थ्यांना आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याच्या माध्यमातून रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवून देण्यात महत्त्वाची मध्यस्थाची भूमिका बजावली होती.

आणखी एक महिला प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

दरम्यान, पुण्यातीलच केमिस्ट्री विषयाच्या तज्ज्ञ असलेल्या एक महिला प्राध्यापक आता सीबीआयच्या रडारवर आहेत. विशेष म्हणजे, या महिला प्राध्यापक नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या समितीमध्ये विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. मनीषा हवालदार यांच्या संपर्कात राहून त्यांनी काही प्रश्नपत्रिकांच्या संदर्भात मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. आता एनटीएच्या तज्ज्ञ समितीमधील रसायनशास्त्र विषयाच्या एका महिला प्राध्यापिकेवर अटकेची टांगती तलवार असून, त्या सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत. या महिला प्राध्यापिका मनीषा हवालदार यांच्या संपर्कात होत्या आणि त्यांनी पेपर फोडण्यास मदत केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

logo
marathi.freepressjournal.in