Mumbai : दिग्दर्शक झोया अख्तरच्या प्रोडक्शन हाऊसमधून ६६ हार्ड डिस्क चोरीला; दोन जण गजाआड

चित्रपट दिग्दर्शक झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या वांद्रे येथील ‘टायगर बेबी डिजिटल एलएलपी’ या प्रोडक्शन हाऊसमधून ६६ हार्ड डिस्क चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका ऑफिस बॉयसह दोन जणांना अटक केली आहे.
Mumbai : दिग्दर्शक झोया अख्तरच्या प्रोडक्शन हाऊसमधून ६६ हार्ड डिस्क चोरीला; दोन जण गजाआड
Mumbai : दिग्दर्शक झोया अख्तरच्या प्रोडक्शन हाऊसमधून ६६ हार्ड डिस्क चोरीला; दोन जण गजाआड
Published on

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या वांद्रे येथील ‘टायगर बेबी डिजिटल एलएलपी’ या प्रोडक्शन हाऊसमधून ६६ हार्ड डिस्क चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका ऑफिस बॉयसह दोन जणांना अटक केली आहे. या चोरीला गेलेल्या हार्ड डिस्कमध्ये विविध चित्रपट आणि वेब सीरिजचा अत्यंत महत्त्वाचा डेटा होता.

‘टायगर बेबी डिजिटल एलएलपी’मधील कार्यकारी सहाय्यक मेहजबीन शेख यांनी यासंदर्भात वांद्रे पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या ६६ हार्ड डिस्कमध्ये आगामी चित्रपट, जाहिराती, पोस्ट प्रोडक्शन बॅकअप आणि वेब सीरिजच्या विविध प्रकल्पांचे डिजिटल साहित्य सुरक्षित ठेवण्यात आले होते.

Mumbai : दिग्दर्शक झोया अख्तरच्या प्रोडक्शन हाऊसमधून ६६ हार्ड डिस्क चोरीला; दोन जण गजाआड
Mumbai : गरीबनगरवर बुलडोझर! वांद्रे पूर्व येथे रेल्वेची मोठी कारवाई; पाच दिवस चालणार मोहीम, ४०० अनधिकृत बांधकामे हटवणार

पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास करत सांताक्रूझ येथील वाकोला परिसरात राहणारा २८ वर्षीय ऑफिस बॉय मोहम्मद शाहिद अझीम खान याला ताब्यात घेतले. त्याने या सर्व हार्ड डिस्क ४४ वर्षीय स्टेशनरी दुकान कर्मचारी रितेश सुरेश शाह याला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. खान याने गेल्या पाच महिन्यांत अत्यंत हुशारीने २४ हार्ड ड्राईव्ह चोरल्या आणि त्या शाह याला प्रत्येकी १५ ते २० हजार रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai : दिग्दर्शक झोया अख्तरच्या प्रोडक्शन हाऊसमधून ६६ हार्ड डिस्क चोरीला; दोन जण गजाआड
Navi Mumbai : रॅपिडोच्या नावाखाली दुचाकी चोरणारा जेरबंद; ५ मोटारसायकलींसह २ मोबाईल जप्त करत ७ गुन्हे उघडकीस

प्राथमिक अंदाजानुसार, गेल्या काही महिन्यांत या कंपनीच्या कार्यालयातून एकूण १०० हून अधिक हार्ड डिस्क गायब झाल्या आहेत. पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्यांना २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in