Mumbai : मोतीलाल नगर पुनर्विकासाचे आयओए तत्काळ रद्द करा; मोतीलाल नगर विकास समितीची म्हाडाकडे मागणी

मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाने जारी केलेले आयओए तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी मोतीलाल नगर विकास समितीने म्हाडा प्राधिकरणाकडे केली आहे.
Mumbai : मोतीलाल नगर पुनर्विकासाचे आयओए तत्काळ रद्द करा! मोतीलाल नगर विकास समितीची म्हाडाकडे मागणी
Mumbai : मोतीलाल नगर पुनर्विकासाचे आयओए तत्काळ रद्द करा! मोतीलाल नगर विकास समितीची म्हाडाकडे मागणी(संग्रहित छायाचित्र FPJ)
Published on

मुंबई : मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाने जारी केलेले आयओए तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी मोतीलाल नगर विकास समितीने म्हाडा प्राधिकरणाकडे केली आहे. या आयओएनुसार पुनर्विकास प्रकल्पासाठी शिल्प असोसिएट्स ही आर्किटेक्ट फर्म आणि इस्टेट व्ह्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (पीएमसी) या दोघांच्याही नियुक्तीमध्ये गंभीर अनियमितता झाल्याच मोतीलाल नगर विकास समितीने म्हाडाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

मोतीलाल नगर विकास समितीने म्हाडाला केलेल्या लेखी तक्रारीनंतर म्हाडाने मे इस्टेट व्ह्यू डेव्हलपर प्रा.लि. तसेच वास्तुविशारद मे. शिल्प असोसिएट्स या दोन्ही कंपन्यांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून ७ दिवसांच्या आत लेखी खुलासा मागितला असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai : मोतीलाल नगर पुनर्विकासाचे आयओए तत्काळ रद्द करा! मोतीलाल नगर विकास समितीची म्हाडाकडे मागणी
Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित

या प्रकल्पामध्ये वास्तुविशारद, परवानाधारक सर्वेक्षक (एल.एस.) म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेले आर्किटेक्ट नोंदणीकृत नसल्याचा गंभीर मुद्दा मोतीलाल नगर विकास समितीने मांडला आहे.

logo
marathi.freepressjournal.in