Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये ट्रॅफिक निर्बंध; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या सविस्तर

१४ एप्रिलनिमित्त वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले असून काही मार्ग एकमार्गी करण्यात आले आहेत.
Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये ट्रॅफिक निर्बंध; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या सविस्तर
Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये ट्रॅफिक निर्बंध; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या सविस्तर
Published on

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी दादरमधील चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादनासाठी दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी दादर-शिवाजी पार्क परिसरात वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध आज (दि. १३) पासून १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.

प्रमुख रस्ते बंद, काही मार्ग एकमार्गी

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले असून काही मार्ग एकमार्गी करण्यात आले आहेत. एसव्हीएस मार्ग (सिद्धिविनायक मंदिर ते येस बँक जंक्शन) पूर्णपणे बंद राहणार आहे. ज्ञानेश्वर मंदिर मार्ग हा एसव्हीएस मार्गापासून दादर चौपाटीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

तसेच एस. के. बोले रोड हा सिद्धिविनायक मंदिर ते पोर्तुगीज चर्चदरम्यान एकमार्गी करण्यात आला आहे. याशिवाय रानडे रोड, ज्ञानेश्वर रोड आणि इतर काही मार्गांवरही वाहतूक निर्बंध लागू असतील.

Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये ट्रॅफिक निर्बंध; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या सविस्तर
आंबेडकर जयंतीनिमित्त मध्यरात्री विशेष ट्रेन; CSMT-कल्याण व पनवेल मार्गावर अतिरिक्त गाड्या, वाचा वेळापत्रक

'नो पार्किंग' झोन जाहीर

या काळात वीर सावरकर मार्ग (सेंच्युरी जंक्शन ते येस बँक जंक्शन), रानडे रोड, केळुसकर रोड आणि ज्ञानेश्वर मंदिर मार्ग हे 'नो पार्किंग' झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

पर्यायी पार्किंग व्यवस्था

नागरिकांसाठी पर्यायी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेनापती बापट मार्ग (माहीम ते दादर), इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, कोहिनूर स्क्वेअर, कोहिनूर मिल कंपाऊंड, कामगार स्टेडियम आणि माटुंगा येथील फाईव्ह गार्डन्स येथे वाहनतळ उपलब्ध असणार आहेत.

मध्य रेल्वेकडून मध्यरात्री विशेष गाड्या

प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष मध्यरात्रीच्या गाड्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण गाडी रात्री १.३० वाजता सुटून ३.०० वाजता कल्याणला पोहोचेल. तसेच कल्याणहून सीएसएमटीकडेही याच वेळेत गाडी धावणार आहे.

Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये ट्रॅफिक निर्बंध; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या सविस्तर
Ambedkar Jayanti 2026 : १४ एप्रिल स्पेशल क्रीमी राईस खीर; घरीच बनवा सोपी रेसिपी

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल गाडी १.३० वाजता सुटून २.५० वाजता पोहोचेल, तर पनवेलहून सीएसएमटीकडेही याच वेळेत सेवा उपलब्ध असेल.

बेस्टकडून अतिरिक्त बस सेवा

बेस्टकडून दादर स्थानक ते शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी दरम्यान अतिरिक्त बस सेवा चालवण्यात येणार आहे. १४ एप्रिल रोजी रात्री १२.०१ ते रात्री १० वाजेपर्यंत या सेवा उपलब्ध असतील.

प्रशासनाचे आवाहन

मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक वापरावी, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रवासाचे नियोजन आगाऊ करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in