

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) निमित्त अनेकजण त्यांच्या आवडीच्या पदार्थांची आठवण काढतात. काही संदर्भांनुसार, बाबासाहेबांना साधे पण चविष्ट पदार्थ प्रिय होते. त्यामध्ये भाताची खीर हा एक खास आवडता पदार्थ होता. त्यामुळे जयंतीच्या निमित्ताने घरीच सहज आणि पटकन तयार होणारी क्रीमी, गोड आणि पारंपरिक 'राईस खीर' बनवून हा दिवस अधिक खास करता येईल.
साहित्य :
तांदूळ (सुमारे ५० ग्रॅम) - १ कप
दूध - १ लिटर
कंडेन्स्ड मिल्क (Milkmaid) - १ कप
वेलची पूड - अर्धा टीस्पून
सुका मेवा (काजू, बदाम, मनुका) - ३ टेबलस्पून
कृती :
तांदूळ स्वच्छ धुवून १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. एका भांड्यात दूध घेऊन त्यात तांदूळ घालून मंद आचेवर शिजवा (किंवा प्रेशर कुकरमध्ये १० मिनिटे शिजवू शकता). तांदूळ मऊ झाल्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून ५ ते ७ मिनिटे सतत ढवळत शिजवा. खीर घट्ट होत आली की गॅस बंद करा. शेवटी वेलची पूड आणि काजू, बदाम, मनुका घालून सजवा. गरम किंवा थंड सर्व्ह करा.
टिप्स :
तांदूळ आधी भिजवल्यास खीर लवकर आणि एकसारखी शिजते.
दूध खाली लागू नये म्हणून मंद आचेवर शिजवा आणि सतत ढवळत रहा.
अधिक क्रीमी टेक्स्चर हवे असल्यास काही तांदळाचे दाणे हलकेच मॅश करा.
सर्व्ह करण्याआधी थोडा वेळ ठेवल्यास खीर अधिक घट्ट आणि स्वादिष्ट लागते.
सणासाठी सजावट करताना चांदीचा वर्ख किंवा गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करू शकता.