Mumbai : भांडुप स्थानकात रेल्वे रुळ ओलांडताना दुर्घटना; एसी लोकलच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. साहिलला तातडीने अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र...
Mumbai : भांडुप स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना; एसी लोकलच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Mumbai : भांडुप स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना; एसी लोकलच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यूसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले असतानाच भांडुप रेल्वे स्थानकात एक दुर्दैवी दुर्घटना घडली. रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या फलाटावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला एसी लोकलची जोरदार धडक बसली. या अपघातात साहिल नवनाथ थिटे याचा मृत्यू झाला. धडकेनंतर तो ट्रेनच्या केबिनमध्ये अडकून सुमारे १५ ते २० फूट फरफटत गेल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (दि. २६) सायंकाळी ही घटना घडली.

रेल्वे रूळ ओलांडताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल नवनाथ थिटे हा मुलुंड कॉलनीतील अमर नगर परिसरात राहत होता. सोमवारी सायंकाळी ५.३९ वाजण्याच्या सुमारास तो भांडुप रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरून फलाट क्रमांक २ वर जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत होता. याचवेळी मुंबईहून ठाणेमार्गे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वातानुकूलित लोकलची त्याला फलाट क्रमांक ३ जवळ धडक बसली.

धडकेनंतर साहिल ट्रेनच्या केबिनमध्ये अडकला आणि लोकलसोबत सुमारे १५ ते २० फूट फरफटत गेला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. साहिलला तातडीने अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत असतानाच दुर्घटना

मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बिघाड झाल्याने अप आणि डाऊन दिशेच्या धीम्या व जलद मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. कांजूरमार्ग येथील रिले रूममध्ये लागलेली आग आणि मुलुंड ते ठाणे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये कापड अडकल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. लोकल उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. याच दिवशी भांडुप स्थानकात ही दुर्घटना घडली.

Mumbai : भांडुप स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना; एसी लोकलच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा; ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तार अडकली; प्रवासी संतप्त, रुळांवरून पायपीट

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

मात्र, या अपघाताचा रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याशी कोणताही संबंध नसल्याचे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी स्पष्ट केले. साहिलला फलाट क्रमांक ४ वरून फलाट क्रमांक २ वर जाण्याची घाई होती. त्यामुळे त्याने रेल्वे रूळ ओलांडल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

रेल्वे रूळ ओलांडणे जीवावर बेतू शकते

एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. लोकलची गती आणि अंतराचा अंदाज चुकल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी घाई न करता पादचारी पूल, सरकते जिने किंवा स्थानकातील अधिकृत मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते.

Mumbai : भांडुप स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना; एसी लोकलच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Mumbai : ऑफिसला पोहोचलात, पण आता घरी कसं जाणार? मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने; लोकलच्या खोळंब्याने प्रवासी हैराण

मध्य रेल्वेचा खोळंबा

या घटनेनंतर मध्य रेल्वेच्या विस्कळीत वाहतुकीवरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि लोकल सेवांना झालेला विलंब यामुळे प्रवाशांचे हाल झाले असतानाच ही दुर्घटना घडल्याने, काही प्रवाशांकडून या परिस्थितीला मध्य रेल्वेचा खोळंबाही जबाबदार धरला जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in