Mumbai : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; परदेशातील भारतीयांसाठी दूतावासांच्या हेल्पलाइन सुरू

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार नैसर्गिक आपत्ती शाखेकडून सल्ला जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहून केवळ अधिकृत आणि प्रमाणित स्त्रोतांमधूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; परदेशातील भारतीयांसाठी दूतावासांच्या हेल्पलाइन सुरू
Published on

मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार नैसर्गिक आपत्ती शाखेकडून हा सल्ला जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहून केवळ अधिकृत आणि प्रमाणित स्त्रोतांमधूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील नागरिकांना परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांबाबत मार्गदर्शनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Mumbai : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; परदेशातील भारतीयांसाठी दूतावासांच्या हेल्पलाइन सुरू
कुवैतमध्ये अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्याचा दावा; F-15 फायटर जेट कोसळले, Video

देशांतील भारतीयांसाठी विशेष सूचना

या सल्ल्यामध्ये पुढील देशांतील भारतीय नागरिकांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी)

या देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, आवश्यक असल्यास घरातच राहावे आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; परदेशातील भारतीयांसाठी दूतावासांच्या हेल्पलाइन सुरू
Iran vs Israel-US War : मध्यपूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका; विमानसेवा ठप्प, २०० पेक्षा जास्त प्रवासी दुबईत अडकले

दूतावासांची २४x७ हेल्पलाइन कार्यरत

संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी २४ तास कार्यरत हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. नागरिकांनी आपत्कालीन संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ही सूचना केवळ खबरदारी म्हणून जारी करण्यात आली आहे. घाबरण्याचे कारण नसले तरी सतर्कता आणि अधिकृत सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

मुंबईतील कुटुंबीयांनी परदेशातील आपल्या नातेवाईकांशी नियमित संपर्क ठेवावा आणि केवळ सरकारी यंत्रणांकडून जारी करण्यात आलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित देशांतील भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी तेथील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील जाहीर करण्यात आले आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांनी खालील क्रमांक आणि ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पॅलेस्टाईन (रामल्लाह)

फोन : +९७०-५९२९१६४१८
ई-मेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

कतार (दोहा)

फोन : ००९७४-५५६४७५०२
ई-मेल : cons.doha@mea.gov.in

सौदी अरेबिया (रियाध)

फोन : ००-९६६-११-४८८४६९७
व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८
टोल फ्री : ८००-२४७-१२३४
ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in

इस्रायल (तेल अवीव)

फोन : +९७२-५४-७५२०७११ / +९७२-५४-२४२८३७८
ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in

इराण (तेहरान)

फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९

संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई)

टोल फ्री : ८००-४६३४२
व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१
ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत

फोन : +९६५६५५०१९४६
ई-मेल : community.kuwait@mea.gov.in

बहरीन

फोन : ००९७३-३९४१८०७१

मस्कत (ओमान)

टोल फ्री : ८००७१२३४
व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०
ई-मेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन

फोन : ००९६२-७७० ४२२ २७६

इराक (बगदाद)

फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९
वेबसाईट : https://www.eoibaghdad.gov.in/
ई-मेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमांतूनच माहिती घ्यावी आणि गरज भासल्यास संबंधित दूतावासांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in