नो-पार्किंगमध्ये थर्मो प्लास्टिकचा रंग; BMC च्या वाहनतळात वाहन पार्किंग करा; बेकायदा पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी निर्णय

गेल्या काही वर्षांत मुंबईतील पार्किंगची समस्या अधिक गंभीर होत आहे. मुंबई महापालिकेची सार्वजनिक वाहनतळ असतानाही नो-पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केली जाते. मुंबईतील बेकायदा पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी आता नो-पार्किंग झोन क्षेत्रात थर्मो प्लास्टिकचा रंग लावण्यात येणार आहे. नो-पार्किंगच्या फलकाची संख्या वाढवण्यात येणार आहे.
नो-पार्किंगमध्ये थर्मो प्लास्टिकचा रंग; BMC च्या वाहनतळात वाहन पार्किंग करा; बेकायदा पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी निर्णय
नो-पार्किंगमध्ये थर्मो प्लास्टिकचा रंग; BMC च्या वाहनतळात वाहन पार्किंग करा; बेकायदा पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी निर्णय
Published on

मुंबई : गेल्या काही वर्षांत मुंबईतील पार्किंगची समस्या अधिक गंभीर होत आहे. मुंबई महापालिकेची सार्वजनिक वाहनतळ असतानाही नो-पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केली जाते. मुंबईतील बेकायदा पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी आता नो-पार्किंग झोन क्षेत्रात थर्मो प्लास्टिकचा रंग लावण्यात येणार आहे. नो-पार्किंगच्या फलकाची संख्या वाढवण्यात येणार आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या वाहनतळाकडे मुंबईकर वाहन पार्किंग करतील आणि हळुवार अनधिकृत पार्किंगची समस्या दूर होईल, असा विश्वास मुंबई महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दादर पश्चिम येथील जे. के. सावंत मार्गांवर कोहिनूर गल्लीत मुंबई महापालिकेचे पार्किंग झोन आहे. मात्र, वाहनधारक अधिकृत पार्किंग झोनमध्ये गाडी उभी न करता रस्त्यावरच उभी करतात. यामुळे रस्त्यावरील वाहतूककोंडी वाढते आणि सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो. यावर मुंबई महापालिकेच्या वाहतूक विभागाने तोडगा काढला आहे. पार्किंग झोन असलेल्या आजूबाजूच्या परिसरात नो-पार्किंग फलकांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. थर्मो प्लास्टिकचा रंग, नो पार्किंग फलकाच्या संख्येत वाढ करणे, यामुळे मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळाकडे वाहनचालक आपसूकच येतील. याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्यावर

दादर पश्चिम येथील सार्वजनिक वाहनतळाच्या समोरच पालिकेचे जी उत्तर वॉर्डचे कार्यालय आहे. या रस्त्यावर नो-पार्किंगचे बोर्ड वाहतूक पोलिसांनी लावले आहेत. तरीही या रस्त्यावर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाहने उभी राहतात. त्यांची वाहने पाहून या वॉर्ड कार्यालयात कामानिमित्त येणारे अनेक जणही या रस्त्यांवर दुचाकींसह अन्य वाहने उभी करतात. त्याच्या समोरच्याच कोहीनूर गल्ली असलेल्या जे. के. सावंत मार्गांवर महापालिकेचे सार्वजनिक वाहनतळ आहे. या वाहनतळात १ हजार १२ दुचाकी, चार चाकी, तीन चाकीसह अन्य वाहने उभी करण्याची क्षमता आहे.

नो-पार्किंगचे क्षेत्र वाढवणार

हा प्रतिसाद मिळावा, यासाठी महापालिकेने आता नामी शक्कल लढवली आहे. सार्वजनिक वाहनतळ असलेल्या आजूबाजूच्या परिसरात तेही स्थानक मार्गे जाणाऱ्या रस्त्यांवरील नो-पार्किंगचे क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोतवाल गार्डनसमोर, कुबतरखाना, गणेश पेठ लेन, टी. आर. सावंत ते बाल गोविंद दास यासह अन्य मार्गावर सध्या २०० पेक्षा जास्त नो-पार्किंग बोर्ड आहेत. या ठिकाणी काही जागांवर नो-पार्किंग बोर्ड बसवले आहेत. त्यामुळे या बोर्डची संख्या वाढवतानाच अन्य काही मार्गांवरही नव्याने बोर्ड लावण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in