Mumbai : चणे-फुटाण्याच्या प्रसादात 'ऑरामाईन'चा वापर? कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका; नगरसेवकाचे महापौरांना पत्र

विविध बाजारपेठा, संकुले, मॉल, दुकानात चणे-फुटाण्याचा प्रसाद विकला जातो. मात्र या प्रसादाला आकर्षक रंग देण्यासाठी 'ऑरामाईन' नावाच्या रासायनिक पावडरचा वापर केला जात असल्याचा आरोप नगरसेवक सचिन बाळकृष्ण पाटील यांनी केला आहे...
चणे-फुटाण्याच्या प्रसादात 'ऑरामाईन'चा वापर? कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका; नगरसेवकाचे महापौरांना पत्र
चणे-फुटाण्याच्या प्रसादात 'ऑरामाईन'चा वापर? कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका; नगरसेवकाचे महापौरांना पत्रप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : विविध बाजारपेठा, संकुले, मॉल, दुकानात चणे-फुटाण्याचा प्रसाद विकला जातो. मात्र या प्रसादाला आकर्षक रंग देण्यासाठी 'ऑरामाईन' नावाच्या रासायनिक पावडरचा वापर केला जात असल्याचा आरोप नगरसेवक सचिन बाळकृष्ण पाटील यांनी केला आहे. यामुळे कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने चणे-फुटाण्याच्या प्रसादाची तातडीने तपासणी करून अशा रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेल्या पदार्थांची विक्री थांबवावी, अशी मागणी त्यांनी महापौर रितू तावडे यांना केली आहे.

चणे-फुटाण्याच्या प्रसादात 'ऑरामाईन'चा वापर? कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका; नगरसेवकाचे महापौरांना पत्र
'बर्गर किंग'चा अन्न परवाना रद्द; नागपूर, सोलापुरातही बेकायदा औषध विक्रीविरोधात धडक मोहीम
चणे-फुटाण्याच्या प्रसादात 'ऑरामाईन'चा वापर? कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका; नगरसेवकाचे महापौरांना पत्र
Mumbai : एफडीएने ५ बेकऱ्यांचे परवाने केले रद्द; चार बेकऱ्या बंद

पाटील म्हणाले की, नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे ही महापालिकेची बंधनकारक जबाबदारी आहे. उत्सवांच्या काळात चणे-फुटाण्याचा प्रसाद विक्रीसाठी ठेवला जातो. या प्रसादाला आकर्षक स्वरूप देण्यासाठी 'ऑरामाईन' नावाची रासायनिक पावडर वापरली जाते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in