Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO

नालासोपाऱ्यातील इम्पिरियल हाईट्स या १४ मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला, तर अग्निशमन दलाने २५ जणांची सुटका केली.
Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO
Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEOX |व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
Published on: 

नालासोपाऱ्यात बुधवारी (दि. १४) मध्यारात्री एका १४ मजली इमारतीला भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पिरियल हाईट्स इमारतीत लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यु झाला, तर सहा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीमुळे संपूर्ण इमारतीत भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य हाती घेत २५ जणांना सुरक्षित बाहेर काढलं.

मध्यरात्री लागली आग

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास इम्पिरियल हाईट्स इमारतीला आग लागली. आग वेगाने पसरू लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट उडाली. काही वेळातच इमारतीत धुराचे लोट पसरले. त्यामुळे अनेकांना बाहेर पडणं कठीण झालं.

धुरामुळे गुदमरून दोन महिलांचा मृत्यू ?

या दुर्घटनेत फाल्गुनी शाह (५०) आणि अश्विनी पारकर (५०) या दोन महिलांचा मृत्यू झाला. प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात पसरलेल्या धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या आगीत बाधित झालेल्या आणखी सहा जणांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

इमारतीच्या बाहेरील कठड्यावर अडकले चौघे

आग आणि धुरापासून बचाव करण्यासाठी चार रहिवाशांनी इमारतीच्या बाहेरील अरुंद कठड्यावर आश्रय घेतला होता. मात्र, ते तिथेच अडकून पडले. जवळपास ४५ मिनिटं हे चौघे मदतीच्या प्रतीक्षेत होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या क्रेनच्या मदतीने या चौघांची सुरक्षित सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाने इमारतीतून एकूण २५ जणांना बाहेर काढलं.

सात अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात

आगीची तीव्रता लक्षात घेऊन घटनास्थळी सात अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जवानांनी रात्रभर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. अखेर बुधवारी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आलं. माजी महापौर रुपेश जाधव यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली.

Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO
Thane : जांभळी नाक्यावर अतिक्रमणांचा भडका; महावितरणच्या डीपीभोवतीच बांधकामाचा विळखा

दरम्यान, आग आटोक्यात आल्यानंतर इमारतीतील उष्णता कमी करण्याचं काम सुरू होतं. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in