"...म्हणून मी अंडरग्राऊंड झालो"; बेपत्ता झालेला राज मुंगासे आला समोर

छत्रपती संभाजीनगरमधील रॅपर राज मुंगासे गेल्या काही दिवसापासून बेपत्ता असल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते
"...म्हणून मी अंडरग्राऊंड झालो"; बेपत्ता झालेला राज मुंगासे आला समोर

छत्रपती संभाजी नगर येथील रॅपर राज मुंगासे याच्याविरुद्ध व्हिडिओमधून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबद्दल अपशब्द आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधून राज मुंगसे बेपत्ता असल्याचे सांगितले होते. यानंतर आज तो माध्यमांसमोर आला असून त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

हेही वाचा :

पोलिसांच्या ताब्यात असलेला 'तो' रॅपर गायब असल्याची धक्कादायक बातमी समोर...

रॅपर राज मुंगासे म्हणाला की, "पोलिसांकडून मला अटक झालीच नाही. पण छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा फोन आला आणि त्यानंतर ते माझ्या घरीही गेले. मी केलेला तो रॅप व्हिडीयो डिलीट कर आणि माफीनामाचा व्हिडीयो सोशल मीडियावर टाक, असे सांगत माझ्यावर त्यांच्याकडून दबाव टाकण्यात आला. पण मी त्या व्हिडियोमध्ये काहीच चुकीचे बोललेलो नाही. मी कोणत्याही व्यक्तीची बदनामी केलेली नाही. मला तो व्हिडियो डिलीट करायचा नव्हता म्हणून मी तिथून निघून गेलो होतो." असे स्पष्टीकरण त्याने दिले.

हेही वाचा :

आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी ; रॅपर राज मुंगासेवर गुन्हा

तो म्हणाला की, "मी कुठे आहे हे माझ्या कुटुंबामध्ये कोणालाच माहिती नव्हते. माझ्या घराचे हळवे असल्यामुळे मी त्यांना सांगितले नाही. त्यांना सांगितले तर ते आजूबाजूला सांगतील म्हणून मी सांगितले नाही. मला पोलीस ताब्यात घेतील आणि तेव्हा सलग ३ दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे मला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायलाही मिळाले नसते म्हणून मी लपून राहिलो." असे त्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, सत्र न्यायालयीन राज मुंगासेला अटकेपासून संरक्षण दिले आहे. न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत त्याला अटक करू नये, असे निर्देश दिले असून त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर महाराष्ट्र पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in