एअर इंडियाकडून २२ टक्के सेवांना कात्री

वाढत्या इंधन दरांचा मोठा फटका सहन करणाऱ्या एअर इंडियाने आपल्या देशांतर्गत विमान फेऱ्यांमध्ये तात्पुरती २२ टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
एअर इंडियाकडून २२ टक्के सेवांना कात्री
एअर इंडियाकडून २२ टक्के सेवांना कात्री(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : वाढत्या इंधन दरांचा मोठा फटका सहन करणाऱ्या एअर इंडियाने आपल्या देशांतर्गत विमान फेऱ्यांमध्ये तात्पुरती २२ टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच टाटा समूहाच्या मालकीच्या या कंपनीने आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये २७ टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि महागडे जेट इंधन यांमुळे आंतरराष्ट्रीय मार्गांवरील परिचालन खर्च प्रचंड वाढल्याने कंपनीने हा निर्णय घेतला होता.

साप्ताहिक फेऱ्या रद्द

एअर इंडिया दर आठवड्याला साधारण ४,४०० विमानांचे संचालन करते. यापैकी सुमारे ३,६०० विमाने देशांतर्गत, तर ८०० विमानांचे आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाण होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता देशांतर्गत विमानांमध्ये २० ते २२ टक्के कपात केली जाईल. ३,६०० साप्ताहिक फेऱ्यांचा विचार करता, २२ टक्के कपातीमुळे दर आठवड्याला ७९० पेक्षा जास्त विमान फेऱ्या कमी होणार आहेत.

एअर इंडियाकडून २२ टक्के सेवांना कात्री
परदेशी विमानसेवेत एअर इंडियाची कपात; दिल्ली-शिकागोसह ६ प्रमुख आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सेवा तात्पुरती स्थगित

या निर्णयाबाबत एअर इंडियाने बुधवारी एका पत्रकात म्हटले आहे की, जून ते ऑगस्ट २०२६ दरम्यान निवडक आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये केलेल्या बदलांनंतर, आता आम्ही याच कालावधीत काही देशांतर्गत मार्गांवरील विमानांचे नियोजन तात्पुरते मर्यादित केले आहे. वाढत्या इंधन दरांचा एकूण कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आम्ही या फेऱ्या पूर्ववत सुरू करू. प्रभावित प्रवाशांना पर्यायी विमानांमध्ये जागा देणे, मोफत तारीख बदलून देणे किंवा पूर्ण परतावा देणे या स्वरूपात मदत केली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

सेवा तात्पुरती बंद

१३ मे रोजी एअर इंडियाने जून-ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जवळपास १०० आंतरराष्ट्रीय फेऱ्या रद्द करण्यात येत असून, ७ महत्त्वाच्या मार्गांवरील सेवा ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये दिल्ली-शिकागो, दिल्ली-नेवार्क, मुंबई-न्यू यॉर्क, दिल्ली-शांघाय, चेन्नई-सिंगापूर, मुंबई-ढाका, दिल्ली-माले या मार्गांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in