

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (दि. १) संसदेत २०२६ चा अर्थसंकल्प सादर केला. सुमारे १ तास २५ मिनिटे चाललेल्या या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी सीमा शुल्क (Custom Duty) संदर्भात महत्त्वाच्या सवलतींची घोषणा केली.
देशात गुंतवणूक वाढत असून, अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. या अर्थसंकल्पातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या, याची माहिती जाणून घेऊया.
स्वस्त होणाऱ्या वस्तूंची यादी:
मूलभूत सीमा शुल्क (Basic Customs Duty -BCD) सवलतीमुळे पुढील वस्तू स्वस्त होणार आहेत.
मायक्रोवेव्ह ओव्हनसह विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादने
कर्करोगासह १७ गंभीर आजारांवरील औषधे
चामड्याच्या वस्तू
क्रीडा साहित्य
मोबाईल फोन
इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) बॅटऱ्या
सौर पॅनेल
व्हिडिओ गेम निर्मितीसाठी लागणारे पार्ट्स
विमानांचे स्पेअर पार्ट्स
कापड उद्योगाशी संबंधित उत्पादने
याशिवाय, परदेशी प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. ओव्हरसीज टूर पॅकेजवर आकारला जाणारा TCS ५–२० टक्क्यांवरून कमी करून फक्त २ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक परवडणारा होणार आहे.
महाग होणाऱ्या वस्तूंची यादी:
दारू
सिगारेट
पान मसाला
खनिजे
घड्याळे
कोळसा
भंगार
या अर्थसंकल्पात सरकारने एकीकडे सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून, दुसरीकडे आरोग्य, उद्योग आणि रोजगारनिर्मितीवर विशेष भर दिल्याचे दिसून येते.