CJP Chalo Sansad March : "माझी प्रकृती उत्तम, मला मोर्चात सहभागी होऊ द्या"; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र

वांगचुक यांना ताब्यात ठेवण्यात आलेले नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना त्यांच्यावर हालचालींवर निर्बंध का आहेत, असा सवाल त्यांच्या समर्थकांनी उपस्थित केला आहे.
CJP Chalo Sansad March : "माझी प्रकृती उत्तम, मला मोर्चात सहभागी होऊ द्या"; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र
CJP Chalo Sansad March : "माझी प्रकृती उत्तम, मला मोर्चात सहभागी होऊ द्या"; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र(Photo-X)
Published on

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सफदरजंग रुग्णालय प्रशासनाकडे तात्पुरते रुग्णालयाबाहेर जाण्याची परवानगी मागितली आहे. CJP च्या 'चलो संसद' मोर्चात सहभागी होण्यासाठी ही परवानगी देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली असून, आपण पूर्णपणे ठणठणीत असल्याचा दावा केला आहे. मोर्चादरम्यान जंतरमंतर परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

CJP Chalo Sansad March : "माझी प्रकृती उत्तम, मला मोर्चात सहभागी होऊ द्या"; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र
"२० जुलैपर्यंत जिवंत राहीन, नाहीतर भूत बनून परत येईन"; सोनम वांगचुक उपोषणावर ठाम

रुग्णालय प्रशासनाला पत्र

सोनम वांगचुक यांच्या टीमने एक्सवर त्यांच्या हस्तलिखित पत्राची प्रत शेअर केली. त्यामध्ये वांगचुक यांनी, "आज माझी प्रकृती पूर्णपणे चांगली असून माझ्या आरोग्याशी संबंधित सर्व बाबी सामान्य आहेत. त्यामुळे संसदेकडे निघणाऱ्या 'चलो संसद' मोर्चात सहभागी होण्यासाठी मला तात्पुरते रुग्णालयाबाहेर जाण्याची परवानगी द्यावी," अशी विनंती केली आहे.

'ताब्यात नाही, मग निर्बंध का?'

वांगचुक यांना ताब्यात ठेवण्यात आलेले नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना त्यांच्यावर हालचालींवर निर्बंध का आहेत, असा सवाल त्यांच्या समर्थकांनी उपस्थित केला आहे.

वांगचुक यांच्या टीमने म्हटले, "त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना ताब्यात ठेवलेले नाही, असे सांगितले जात आहे. मग त्यांच्यावर निर्बंध का आहेत?"

'बेकायदेशीर नजरकैद' असल्याचा आरोप

यापूर्वी उपोषणाच्या २१ व्या दिवशी वांगचुक यांनी एक्सवर पोस्ट करत सफदरजंग रुग्णालयातील वास्तव्यास 'बेकायदेशीर नजरकैद' असे संबोधले होते. तसेच, आपल्या हालचाली, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संवाद साधण्याच्या अधिकारावर निर्बंध घालण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

सरकारने शिक्षण व्यवस्थेतील अपयश आणि पेपरफुटी प्रकरणांची जबाबदारी स्वीकारावी किंवा राजकीय पक्षांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन द्यावे, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली.

'चलो संसद' मोर्चात गोंधळ

CJP च्या 'चलो संसद' मोर्चासाठी जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जमले होते. संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करताच आंदोलक आणि दिल्ली पोलीस तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या जवानांमध्ये धक्काबुक्की झाली.

मोर्चा पुढे जाऊ नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांना अडवले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

CJP Chalo Sansad March : "माझी प्रकृती उत्तम, मला मोर्चात सहभागी होऊ द्या"; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र
सोनम वांगचुक बळजबरीने रुग्णालयात; दिल्ली पोलिसांची कारवाई, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, दीपके यांनी सुरू केले उपोषण

प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात दाखल

दीर्घकाळ उपोषणामुळे प्रकृती खालावल्यानंतर शनिवारी सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in