डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या उन्हापासून बचावासाठी कंपन्यांची उपाययोजना

देशाच्या मोठ्या भागात उष्णतेची लाट सुरू असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे.
डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या उन्हापासून बचावासाठी कंपन्यांची उपाययोजना
डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या उन्हापासून बचावासाठी कंपन्यांची उपाययोजना'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : देशाच्या मोठ्या भागात उष्णतेची लाट सुरू असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स, क्विक-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सनी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना उन्हापासून वाचवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. डिलिव्हरी भागीदारांना डिहायड्रेशन, उष्णतेचा त्रास आणि उष्माघाताचा धोका असल्याने कंपन्या त्यांना थंड कपडे आणि वातानुकूलित विश्रामगृहांची सुविधा देत आहेत.

'ॲमेझॉन'ने 'प्रोजेक्ट आश्रय' अंतर्गत १०० वातानुकूलित विश्रामगृहे सुरू केली आहेत. यामध्ये बसण्याची सोय, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, चार्जिंग आणि प्रथमोपचार सुविधा आहेत. या सुविधांचा दरमहा १,५०,००० डिलिव्हरी भागीदार लाभ घेत आहेत. कंपनीतर्फे आरोग्य शिबिरे आणि मोफत रुग्णवाहिका सेवाही दिली जात आहे. तसेच, 'फ्लिपकार्ट'ने 'डॉक्टर ऑन कॉल' सेवा सुरू केली असून कर्मचाऱ्यांना उन्हापासून बचाव करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

'झोमॅटो'ने रेस्टॉरंट भागीदार, 'टीव्हीएस' आणि 'शेल' यांच्यासोबत ५,००० हून अधिक विश्रामगृहे तयार केली आहेत. कंपनी झोमॅटो आणि ब्लिंकइटच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देत असून स्वस्त सनस्क्रीन जॅकेटही उपलब्ध करून दिले आहेत. 'स्विगी'ने बाष्पीभवन तंत्रज्ञानावर आधारित थंड जॅकेट आणले आहेत, जे शरीराचे तापमान ६ ते ७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी करू शकतात.

डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या उन्हापासून बचावासाठी कंपन्यांची उपाययोजना
Mumbai : छुप्या शुल्कामुळे ग्राहक आणि रेस्टॉरंट व्यावसायिक त्रस्त; जेवणाच्या मूळ किमतीवर २५ ते ४० टक्के अधिक कमिशन

'बिगबास्केट'चे लास्ट माईल डिलिव्हरी राष्ट्रीय प्रमुख आशुतोष तापरिया यांनी सांगितले की, स्टोअरमध्ये विश्रामगृहे तयार करून पिण्याचे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट पावडरसारख्या सुविधा दिल्या जात आहेत.

'झेप्टो'चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास शर्मा यांनी सांगितले की, डार्क स्टोअरमध्ये कुलर आणि उष्णता परावर्तित करणारे छताचे कोटिंग करण्यात आले आहे. तसेच ब्लिंकइट 'डॉक्टर@स्टोअर' सेवा वाढवत आहे.

प्लॅटफाॅर्म कंपन्यांची सुविधा :

  • स्विगी : कूलिंग जॅकेट्स

  • झोमॅटो : सबसिडाइज्ड सनस्क्रीन जॅकेट्स

  • फ्लिपकार्ट : डाॅक्टर ऑन काॅल सेवा

  • ब्लिंकिट : 'डॉक्टर@स्टोअर' सल्ला

  • ॲमेझाॅन : मोफत ॲम्ब्युलन्स सपोर्ट लाईन

गिग वर्कर्ससाठी सोय :

  • एसी रेस्ट हब्स

  • आरोग्य विमा

  • कूलिंग जॅकेट्स

  • ओआरएस, इलेक्ट्रोलाइट्स

  • ॲम्ब्युलन्स सुविधा

logo
marathi.freepressjournal.in