गरबा झाला, फोटोही काढले... आता ड्रेस परत? रिटर्न पार्सलचा ढीग पाहून नेटकरीही चक्रावले; VIDEO व्हायरल

गरबा संपल्यानंतर कपडे वापरून परत केल्याच्या दाव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिटर्न पार्सलचा ढीग पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली...
गरबा झाला, फोटोही काढले... आता ड्रेस परत? रिटर्न पार्सलचा ढीग पाहून नेटकरीही चक्रावले; VIDEO व्हायरल
गरबा झाला, फोटोही काढले... आता ड्रेस परत? रिटर्न पार्सलचा ढीग पाहून नेटकरीही चक्रावले; VIDEO व्हायरल
Published on: 

नवरात्री आणि गरबा म्हटलं की रंगीबेरंगी कपडे, आकर्षक दागिने आणि सजूनधजून फोटो काढण्याची हौस आलीच. यासाठी अनेक जण ऑनलाइन शॉपिंग करून महागडे ड्रेस मागवतात. पण गरबा संपल्यानंतर हेच कपडे परत केले तर? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. गरब्यासाठी कपडे मागवायचे, ते घालून फोटो काढायचे आणि नंतर परत करायचे, असा प्रकार काही ग्राहक करत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओतील रिटर्न पार्सलचा ढीग पाहून नेटकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

गरबा संपला अन् रिटर्न पार्सलचा ढीग!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका परिसरात मोठ्या प्रमाणात पार्सल जमा झालेली दिसत आहेत. काही पार्सल जमिनीवर ठेवलेली आहेत, तर काही मोठ्या पिशव्यांमध्ये भरलेली दिसतात. डिलिव्हरी कर्मचारी ही पार्सल परत घेण्यासाठी आल्याचं सांगण्यात येत आहे.

हा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला. व्हिडीओ शेअर करताना एका युजरने 'दांडिया संपला... ड्रेस परत' असं कॅप्शन दिलं. त्यानंतर हा व्हिडीओ चर्चेत आला.

एका डिलिव्हरी बॉयकडे ४५ ते ५० पार्सल?

व्हायरल व्हिडीओमध्ये डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना रिटर्न ऑर्डरबद्दल विचारलं जातं. त्यावेळी काहींकडे २० ते २५, तर काहींकडे ४५ ते ५० पार्सल असल्याचा उल्लेख ऐकायला मिळतो.

मात्र, ही सर्व पार्सल गरब्याचे कपडे वापरून परत केलेलीच आहेत का, याची खात्री झालेली नाही. पार्सल परत करण्यामागची नेमकी कारणंही समोर आलेली नाहीत.

नेटकरी म्हणाले, 'प्रामाणिक ग्राहकांना फटका बसेल'

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटलं, "अशा लोकांमुळे हळूहळू वस्तू परत करण्यासाठी केवळ २४ तासांचीच मुदत ठेवली जाईल. त्याचा त्रास प्रामाणिक ग्राहकांना सहन करावा लागेल." तर दुसऱ्याने, "या लोकांमुळे चांगल्या लोकांनाही अडचणी येतील," अशी प्रतिक्रिया दिली. आणखी एका युजरने, "ज्यांना महागडे कपडे परवडत नाहीत, तेही डांडियामध्ये दिखावा करण्यासाठी असे कपडे मागवतात," असं म्हणत टीका केली. काहींनी या प्रकाराला लाजिरवाणं म्हटलं, तर एका युजरने उपरोधिकपणे, "अशाच लोकांमुळे २४ तासांत वस्तू परत करण्याचं धोरण तयार झालं असावं," अशी टिप्पणी केली.

गरबा झाला, फोटोही काढले... आता ड्रेस परत? रिटर्न पार्सलचा ढीग पाहून नेटकरीही चक्रावले; VIDEO व्हायरल
सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

छोट्या विक्रेत्यांचं नुकसान होण्याची भीती

ऑनलाइन मागवलेली वस्तू परत गेल्यास तिच्या वाहतुकीपासून पुन्हा पॅकिंग करण्यापर्यंतचा खर्च विक्रेत्यांना सहन करावा लागू शकतो. विशेषतः वापरलेले किंवा खराब झालेले कपडे परत आल्यास ते पुन्हा विकणं कठीण होतं. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचं नुकसान होऊ शकतं.

अर्थात, कपड्यांचा आकार चुकीचा असणं, वेगळं उत्पादन मिळणं किंवा वस्तू खराब असणं अशा कारणांसाठी रिटर्नची सुविधा महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडीओतील प्रत्येक पार्सल गैरवापरामुळेच परत आलं आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र, या व्हायरल व्हिडीओमुळे ऑनलाइन खरेदी आणि रिटर्न पॉलिसीच्या वापराबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in