'मेटा'ची माफी, तांत्रिक चूक असल्याचा केला खुलासा; फेसबुकने हटवली मोदींची पोस्ट, केंद्र सरकार भडकले

पेपर फुटीविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांशी संवाद साधणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
'मेटा'ची माफी, तांत्रिक चूक असल्याचा केला खुलासा; फेसबुकने हटवली मोदींची पोस्ट, केंद्र सरकार भडकले
'मेटा'ची माफी, तांत्रिक चूक असल्याचा केला खुलासा; फेसबुकने हटवली मोदींची पोस्ट, केंद्र सरकार भडकले
Published on

नवी दिल्ली : पेपर फुटीविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांशी संवाद साधणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, हा व्हिडीओ फेसबुकवरून हटवण्यात आल्याने केंद्र सरकारने तीव्र आक्षेप नोंदवत मेटा कंपनीला समन्स बजावले आहे. मेटा कंपनीने याप्रकरणी माफी मागितली असली तरी, केंद्र सरकारने दिलेले स्पष्टीकरण अमान्य करत हे प्रकरण अजून 'संपलेले नाही' असा इशारा दिला आहे.

मेटाने सरकारला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, ऑटोमेटेड कंटेंट फिल्टरमधील तांत्रिक चुकीमुळे ही पोस्ट हटवली गेली होती. ही चूक लक्षात आल्यावर सदर व्हिडीओ पुन्हा रिस्टोअर करण्यात आला आहे. कंपनीने या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

'मेटा'ची माफी, तांत्रिक चूक असल्याचा केला खुलासा; फेसबुकने हटवली मोदींची पोस्ट, केंद्र सरकार भडकले
'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

राजकीय पक्षपाताचा आरोप २३ जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर एक सेल्फी व्हिडीओ शेअर केला होता, जो नंतर फेसबुकवरही पोस्ट करण्यात आला. यामध्ये त्यांनी पेपर फुटीवर कडक कायदे आणण्याचे आश्वासन दिले होते.

प्रकरण संपलेले नाही

सरकारी सूत्रांनुसार, मेटाने दिलेले स्पष्टीकरण तर्कसंगत नाही. जर त्यांच्या ऑटोमेटेड सिस्टीममुळे ही चूक झाली असेल, तर त्यांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करणे गरजेचे आहे. याप्रकरणी सखोल चर्चेची गरज असून, हे प्रकरण इथेच संपत नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयटी मंत्रालयाने मेटाच्या ग्लोबल हेड ऑफ पब्लिक पॉलिसी यांना समन्स जारी केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in