"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन

सना शेख असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या नीट परीक्षेची तयारी करत होती. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाइड नोट मिळाली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन
"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन
Published on

नीट (NEET) पुनर्परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी हैदराबादमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सना शेख असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या नीट परीक्षेची तयारी करत होती. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाइड नोट मिळाली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मियापूर परिसरातील घटना

'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, सना शेख ही हैदराबादमधील मियापूर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये तिच्या दोन लहान बहिणींसोबत राहत होती. तिचे आई-वडील कामानिमित्त कुवेतमध्ये असून जवळच राहणारी तिची आत्या त्यांचा सांभाळ करत होती.

सुसाइड नोटमध्ये काय लिहिले?

पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यामध्ये, "माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये. मी स्वतःचे आयुष्य संपवत आहे," असे लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

NEET परीक्षेची तयारी होती सुरू

सना गेल्या वर्षभरापासून NEET परीक्षेची तयारी करत होती. तिने इंटरमिजिएट परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, परीक्षेचा ताण आणि भविष्यासंबंधीची चिंता यामुळे ती मानसिक तणावात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन
NEET विद्यार्थिनी आत्महत्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला नोटीस

दुपारपर्यंत खोलीतून बाहेर न आल्याने संशय

शनिवारी सकाळी सना आणि तिच्या बहिणींनी एकत्र नाश्ता केला होता. त्यानंतर ती अभ्यासासाठी खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. दुपारच्या जेवणासाठी बहिणींनी आवाज दिला असता तिने प्रतिसाद दिला नाही. यानंतर कुटुंबीयांना संशय आला आणि प्रकार उघडकीस आला.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पेपरफूटीनंतर NEET पुनर्परीक्षा

३ मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफूटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली. त्यानंतर आज २१ जून रोजी पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आल्याने NEET परीक्षार्थी विद्यार्थ्यांवरील वाढत्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in