UP Accident : दाट धुक्यामुळे भीषण अपघात; बसची ट्रॅक्टरला धडक, आई-मुलासह चौघांचा मृत्यू, १० जखमी

जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
UP Accident : दाट धुक्यामुळे भीषण अपघात; बसची ट्रॅक्टरला धडक, आई-मुलासह चौघांचा मृत्यू, १० जखमी
UP Accident : दाट धुक्यामुळे भीषण अपघात; बसची ट्रॅक्टरला धडक, आई-मुलासह चौघांचा मृत्यू, १० जखमी(X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
Published on: 

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे शनिवारी (दि. २८) पहाटे दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत पाच वर्षांच्या चिमुकल्यासह चार जणांचा मृत्यू झाला असून, अन्य १० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

UP Accident : दाट धुक्यामुळे भीषण अपघात; बसची ट्रॅक्टरला धडक, आई-मुलासह चौघांचा मृत्यू, १० जखमी
Rajasthan Accident : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, ६ जखमी

नेमका अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास कांठ मार्गावरील छजलैट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लाडावली गावाजवळ हा अपघात झाला. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस बिजनौरहून मुरादाबादच्या दिशेने जात होती. त्याचवेळी ऊसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली विरुद्ध दिशेने येत होती. गावाच्या पुढे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. पहाटेच्या वेळी दाट धुके असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे चालकांना समोरून येणारे वाहन दिसले नसावे आणि हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आई आणि पाच वर्षांच्या मुलाचाही मृत्यू

या अपघातात अर्चना (३२), त्यांचा पाच वर्षांचा मुलगा सुशांत, नूरपूर येथील रहिवासी लोकेंद्र (५०) आणि दीपिका चौहान (३०) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अर्चना यांचे पती जॉन्सन मसीह हेदेखील जखमी झाले आहेत. आई आणि चिमुकल्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक कुंवर आकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर उपचार सुरू असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूकही पूर्ववत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त

या भीषण दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून, जखमींना योग्य आणि तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, असे निर्देश जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)