WhatsApp युजर्सना अलर्ट! आजपासून नवे नियम लागू; Web वापरावरही परिणाम

आतापर्यंत WhatsApp ‘व्हेरिफाय वन्स’ मॉडेलवर कार्यरत होतं. एकदा ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर वापरकर्त्याने फोनमधून सिम काढलं तरी अ‍ॅप चालू राहायचं. तसंच, WhatsApp Web, डेस्कटॉप अ‍ॅप किंवा इतर डिव्हाइसवरही सहज वापर करता येत होता.
WhatsApp युजर्सना अलर्ट! आजपासून नवे नियम लागू; Web वापरावरही परिणाम
WhatsApp युजर्सना अलर्ट! आजपासून नवे नियम लागू; Web वापरावरही परिणाम'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मोबाईलशिवाय दैनंदिन संवादाची कल्पनाही कठीण झाली आहे आणि त्यातही मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरलं जाणारं अ‍ॅप म्हणजे WhatsApp. मात्र जगभरात अब्जावधी लोक वापरत असलेल्या या लोकप्रिय मेसेजिंग या अ‍ॅपच्या वापरासंदर्भात आजपासून एक महत्त्वाचा बदल लागू होत असल्याची चर्चा सुरू आहे.

१ मार्च २०२६ पासून भारतीय युजर्ससाठी 'सिम बाइंडिंग' अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे WhatsApp वापरण्याच्या पद्धतीत काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात.

सिम बाइंडिंग म्हणजे काय?

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) टेलिकॉम सायबर सिक्युरिटी नियम २०२४ अंतर्गत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. या नियमानुसार WhatsApp अकाऊंट हे वापरकर्त्याच्या मुख्य मोबाईलमधील अ‍ॅक्टिव्ह सिम कार्डशी जोडलेलं असणं आवश्यक राहील.

म्हणजेच, ज्या मोबाईल नंबरवर तुमचं WhatsApp अकाऊंट नोंदणीकृत आहे ते सिम कार्ड फोनमध्ये सक्रिय असणं बंधनकारक ठरेल.

आतापर्यंत काय होतं?

आतापर्यंत WhatsApp ‘व्हेरिफाय वन्स’ मॉडेलवर कार्यरत होतं. एकदा ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर वापरकर्त्याने फोनमधून सिम काढलं तरी अ‍ॅप चालू राहायचं. तसंच, WhatsApp Web, डेस्कटॉप अ‍ॅप किंवा इतर डिव्हाइसवरही सहज वापर करता येत होता. सिम फोनमध्ये आहे की नाही, याची नियमित पडताळणी होत नव्हती.

WhatsApp युजर्सना अलर्ट! आजपासून नवे नियम लागू; Web वापरावरही परिणाम
२०२७ ची जनगणना डिजिटल पद्धतीने करणार; सर्व कामे मोबाईल फोनद्वारे केली जाणार

आता काय बदलणार?

सिम बाइंडिंग लागू झाल्यानंतर ही प्रणाली बदलली आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp वेळोवेळी-साधारण सहा तासांच्या अंतराने सिम फोनमध्ये सक्रिय आहे का, याची पडताळणी करू शकतं. जर सिम फोनमधून काढलं किंवा बंद झालं, तर WhatsApp पुन्हा सक्रिय करण्यासाठी तेच सिम परत फोनमध्ये टाकून व्हेरिफिकेशन करावं लागू शकतं.

मल्टी-डिव्हाइस वापरावर परिणाम?

या बदलाचा सर्वाधिक परिणाम मल्टी-डिव्हाइस वापरावर होण्याची शक्यता आहे. WhatsApp Web, डेस्कटॉप अ‍ॅप किंवा सेकंडरी फोनवर वापर करताना काही वेळाने पुन्हा लॉगिन करण्याची आवश्यकता भासू शकते.

यामुळे अनेक व्यावसायिक आणि सतत वेगवेगळ्या डिव्हाइसवर काम करणाऱ्या युजर्सना थोडा त्रास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारचा दावा काय?

सरकारच्या मते देशात वाढत असलेल्या सायबर फसवणुकीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा फसवणूक करणारे लोक भारतीय नंबरवर एकदाच ओटीपी घेऊन अकाऊंट सुरू करतात आणि नंतर ते परदेशातून किंवा दुसऱ्या ठिकाणावरून वापरतात.

सिम बाइंडिंगमुळे प्रत्येक अकाऊंट प्रत्यक्ष सिमशी जोडलेलं राहील. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांचा माग काढणं सोपं होईल आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवता येईल, असा सरकारचा दावा आहे.

युजर्सना नोटिफिकेशन?

दरम्यान, काही भारतीय युजर्सना WhatsAppकडून यासंदर्भात नोटिफिकेशन मिळण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृत स्तरावर सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

शेवटी काय लक्षात ठेवायचं?

WhatsApp बंद होणार नाही, मात्र त्याच्या वापरात काही तांत्रिक बदल होऊ शकतात. युजर्सनी आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर सक्रिय ठेवणं आणि सिम कार्ड नियमित वापरात असल्याची खात्री करणं आवश्यक ठरेल. सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा ठरू शकतो, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच त्याचा परिणाम स्पष्ट होईल.

logo
marathi.freepressjournal.in