Navi Mumbai : फ्लेमिंगो अभयक्षेत्राबाबत राज्य खारफुटी कक्षाकडून पाहणीचे आदेश; डीपीएस तलावाजवळ उंच इमारतींचा धोका

नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाजवळील खारफुटी लगतच्या भूखंड वाटपात किनारी नियमन क्षेत्र नियमांचे कथित उल्लंघन झाल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे.
फ्लेमिंगो अभयक्षेत्राबाबत राज्य खारफुटी कक्षाकडून पाहणीचे आदेश; डीपीएस तलावाजवळ उंच इमारतींचा धोका
फ्लेमिंगो अभयक्षेत्राबाबत राज्य खारफुटी कक्षाकडून पाहणीचे आदेश; डीपीएस तलावाजवळ उंच इमारतींचा धोका
Published on

उरण : नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाजवळील खारफुटी लगतच्या भूखंड वाटपात किनारी नियमन क्षेत्र नियमांचे कथित उल्लंघन झाल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्य खारफुटी कक्षाने या वादग्रस्त जागेची मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

हा भूखंड पूर्णपणे खारफुटी संरक्षक पट्ट्यात येत असून तो डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धन राखीव क्षेत्राला लागूनच असल्याचा आक्षेप ‘नॅटकनेक्ट’ फाऊंडेशनने खारफुटी कक्षाकडे केलेल्या तक्रारीत घेतला आहे. २०२४ मध्ये याच परिसरातील एका महाकाय जाहिरात फलकावर धडकून अनेक फ्लेमिंगो पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थलांतरित पक्ष्यांना शहरी पायाभूत सुविधांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत मोठी चिंता व्यक्त करण्यात आली होती, तसेच या संवर्धन राखीव क्षेत्राच्या योजनेला अधिक गती मिळाली होती.

फ्लेमिंगो अभयक्षेत्राबाबत राज्य खारफुटी कक्षाकडून पाहणीचे आदेश; डीपीएस तलावाजवळ उंच इमारतींचा धोका
MMRमध्ये लवकरच ‘फ्लेमिंगो ब्ल्यू कार्बन नागरी संकुल’; ‘नॅटकनेक्ट’च्या श्वेतपत्रिकेची केंद्राकडून दखल, राज्य प्राधिकरणाला ‘प्राधान्याने’ कार्यवाहीचे निर्देश

‘नॅटकनेक्ट’चे संचालक बी. एन. कुमार यांनी यावर चिंता व्यक्त करताना सांगितले की, उंच इमारतींमुळे स्थलांतरित तसेच स्थानिक पक्ष्यांच्या जलक्षेत्राकडे येणाऱ्या उड्डाण मार्गांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे पक्षी जलाशयाच्या पर्यावरणीय स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, ओलसर प्रदेशाजवळील अशी उंच बांधकामे त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात.

‘सेक्टर ५२-अ’ मधील या भूखंडावर एका खासगी विकासकाने बांधकाम प्रस्तावित केले असून खारफुटीलगत रस्त्याचाही प्रस्ताव आहे. कुमार म्हणाले की, त्यांचा कोणत्याही स्थावर मालमत्ता विकासाला विरोध नाही, मात्र सर्व प्रकल्पांनी पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

फ्लेमिंगो अभयक्षेत्राबाबत राज्य खारफुटी कक्षाकडून पाहणीचे आदेश; डीपीएस तलावाजवळ उंच इमारतींचा धोका
Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी

दरम्यान, डीपीएस तलाव आणि एनआरआय पोलीस ठाण्यादरम्यानच्या पट्ट्यात सिडकोने आखलेल्या विकास आराखड्याबाबतही पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. जलवाहतूक प्रवासी टर्मिनल आणि त्याच्या जोडरस्त्यासाठी आवश्यक कास्टिंग यार्ड उभारण्याकरिता पूर्वी भराव टाकून जे भूखंड तयार केले होते. त्यांचाच यात समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मंगळवारी होणाऱ्या खारफुटी कक्षाच्या पाहणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in