Navi Mumbai : भाज्यांची दरवाढ; उन्हाचा तडाखा, इंधन दरवाढीचा फटका

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारतासह अनेक देशान्ना इंधन पुरवठा नियमित होत नाही.
Navi Mumbai : भाज्यांची दरवाढ; उन्हाचा तडाखा, इंधन दरवाढीचा फटका
Navi Mumbai : भाज्यांची दरवाढ; उन्हाचा तडाखा, इंधन दरवाढीचा फटका'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी मुंबई : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारतासह अनेक देशान्ना इंधन पुरवठा नियमित होत नाही. त्याचा फटका आता गावपातळीवर बसत आहे. अघोषित मालवाहतूकच्या दरवाढीमुळे भाज्यांची दरवाढ झाली आहे.

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असून त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही जाणवत आहे. किरकोळ बाजारात भाज्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत.

Navi Mumbai : भाज्यांची दरवाढ; उन्हाचा तडाखा, इंधन दरवाढीचा फटका
Fuel Price Hike : चौथ्यांदा इंधन भडका; पेट्रोलचे भाव २.६१ ने, तर डिझेल २.७१ ने वाढले

देशांतर्गत इंधन दरांवर होत असून गेल्या दहा दिवसांत डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक दरात १०% वाढ़ करण्यात आली. मात्र ग्रामीण भागात डिझेल मिळवण्यासाठी धांदल उडत असल्याने वाहतूकदार जादा पैसे आकारात असल्याचे अनेक ठिकाणी चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत कमालीची वाढ झाल्याने भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भाज्या वाया जात असल्याने ते नुकसान भरून काढण्यासाठी दर चढे करावे लागत असल्याची प्रतिक्रिया किरकोळ भाजी विक्रेता अरविंद गुप्ता याने दिली.

भाज्यांचे उत्पादन दरवर्षी प्रमाणे आहे. मात्र उष्णतेने माल लवकर खराब होणे आणि वाहतुकीचे वाढलेले दर, सुट्ट्या असल्याने फारसा उठाव नसणे या कारणांनी होणारी तूट भरून काढण्यासाठी दर चढे आहेत.

मनीष पाटील, घाऊक भाजीपाला व्यापारी

logo
marathi.freepressjournal.in