चर्चा तर होणारच... अमृता फडणवीस यांचे मजेशीर 'ट्विट' कोणासाठी ?

येणाऱ्या पावसाळ्याचे निमित्त साधून त्यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये...
Amruta fadanvis
Amruta fadanvisANI

अमृता फडणवीस आणि त्यांचा सोशल मीडियावरील अपिअरन्स हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यांनी केलेले एकदेखील ट्विट हे बातमी झाल्याशिवाय राहात नाही. अशातच त्यांनी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत केलेले एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये जरी त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी, रिकाम्या जागा भरण्यास सांगितल्या आहेत. त्यांनी नेटकऱ्यांना विविध पर्याय दिले आहेत. अमृता फडणवीस यांनी 'आज मी..' अशी टि्वटची सुरुवात करीत पुढे जागा रिकामी ठेवली आहे. ही जागा भरण्यासाठी फडणवीस यांनी पर्याय दिलेत. 

येणाऱ्या पावसाळ्याचे निमित्त साधून त्यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये ठाकरे सरकारचं नाव घेतलं नसलं तरीही त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या या टि्वटमधील कॉमेन्ट बॉक्समध्ये (Comment Box) नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी दिले आहेत हे पर्याय?

Corona Positive आढळले आहे.

एक दुःखद प्रेमगीत लिहित आहे.

पावसाळ्याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आढावा घेण्याची योजना आखत आहे.

त्यांच्या या प्रश्नांवर अनेक मिम्स तसेच मजेशीर कमेंटसचा पाऊस पडत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in