चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिमंडळ विस्तारावर स्पष्टच बोलले ; म्हणाले, "मी मुख्यमंत्र्यांना..."

शिंदे गटाच्या आमदारांचा भ्रमनिरास झाला असून मंत्रीपदाची उरली सुरली आशासुद्दा मावळली असल्याचा टोला खासदार विनायक राऊत यांनी आमदार भरत गोगावलेंना लगावला होता.
चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिमंडळ विस्तारावर स्पष्टच बोलले ; म्हणाले, "मी मुख्यमंत्र्यांना..."
Published on

सत्तेतील शिंदे गट आणि भारपा आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या विस्तारात अजित पवार यांच्या गटातील आमदारांना नऊ मंत्रीपदं मिळाली. मात्र, शिंगे गट आणि भाजपाच्या आमदारांना यावेळी काहीही मिळालं नाही. यामुळे अद्याप हे आमदार मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी केली जात आहे. अशात आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमडळ विस्ताराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. लवकरच राज्यातली मंत्रिपदे भरली जातील अशी अपेक्षा आहे.

ते पुढे म्हणाले की, भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नागपूरच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करावा यासाठी विनंती करणार आहे. मंत्री आणि आमदारांनी अधिवेशनासाठी नागपूरला येण्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा गेले असताना त्यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे. शिंदे गटाच्या आमदारांचा आता भ्रमनिरास झाला असून मंत्रीपदाची उरली सुरली आशासुद्दा आता मावळली आहे. रायगडच्या आमदाराला मंत्रीपदाची आशा होती ती देखील आता मावळली आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नाव न घेतला आमदार भरत गोगावले यांना लगावला.

logo
marathi.freepressjournal.in