"मुस्लीम-दलित आणि आदिवासींचा नरसंहार घडवण्याचा कट", भाजप-आरएसएसचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान

ऐन निवडणुकीच्या तोंडावर देशातील मुस्लीम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास भाजपा-आरएसएस मागेपूढे पाहणार नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
"मुस्लीम-दलित आणि आदिवासींचा नरसंहार घडवण्याचा कट", भाजप-आरएसएसचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान
Published on

2024 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून प्रत्येक पक्ष यासाठी मोर्चे बांधीणी करताना दिसत आहेत. आशात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या धक्कादायक विधानाने खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर देशातील मुस्लीम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास भाजपा-आरएसएस मागेपूढे पाहणार नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात 'एक्स'वर(ट्विटर) पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले आहे की, "जातीय द्वेष आणि त्यातून हत्या घडवून आणण्याचा भाजपा-आरएसएसचा इतिहास पाहता त्यांचा निवडणुका जिंकण्याचा पारंपारिक अजेंडा असल्याचं दिसतं. आता पुन्हा निवडणुका तोंडावर असताना गुजरात दंगलीप्रमाणे भारतातील लोकशीहीची आणि देशातील मुस्लीम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास ते(BJP, RSS) मागेपूढे पाहणार नाहीत, अशी शक्यता वाटते", प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यावने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी भाविकांचा सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, "अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी भाविकांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी. तसंच राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजीकडे सोपवावी, अशी गांभीर्यपूर्वक मागणी मी करत आहे.", असं ते आपल्या 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in