सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

मध्य प्रदेशातील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला ओबीसी समाजाचा सर्वात मोठा शत्रू म्हणून संबोधले आहे, असे म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यांवरून त्यांच्यावर निशाणा साधला.
सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण;  "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

हैदराबाद : राज्यघटनेने संमत केलेल्या सर्व आरक्षणला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) पूर्णपणे पाठिंबा आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हैदराबाद येथील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले. देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यादरम्यान आरएसएस आरक्षणाच्या विरोधात असल्याचा एक व्हिडीओ फिरत आहे, त्या व्हिडिओवर मनोहन भागवत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मोहन भागवत म्हणाले, सध्या एक व्हिडीओ फिरत आहे. आरएसएस आरक्षणाच्या विरोधात असून ते बाहेर आरक्षणाविरोधात बोलत नाहीत. परंतु, तो व्हिहीओ पूर्णपणे खोटा आहे. हे असत्य आणि चुकीचे आहे. संघाने नेहमीच राज्यघटनेने संमत केलेल्या सर्व आरक्षणला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. आरक्षण ज्यांच्यासाठी आहे, त्यांना जोपर्यंत आरक्षणाची गरज वाटेल आणि सामाजिक भेदभाव जोपर्यंत आहेत. तोपर्यंत आरक्षण सुरू राहिले पाहिजे. काही लोक खोटे व्हिडीओ पसरवित करत आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

कर्नाटकात ओबीसी आरक्षणापासून वंचित - पंतप्रधान मोदी

मध्य प्रदेशातील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला ओबीसी समाजाचा सर्वात मोठा शत्रू म्हणून संबोधले आहे, असे म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यांवरून त्यांच्यावर निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसने पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये मागच्या दाराने ओबीसीमध्ये सर्व मुस्लिम जातींचा समावेश करून धार्मिक आधारावर आरक्षण दिले आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागत आहे, असा आरोप त्यांनी केला.

देवेगौडा यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी - सिद्धरामय्या

कर्नाटकातील आरक्षणाचा वाद वाढल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, काँग्रेसने मागासवर्गीयांचे आरक्षण मुस्लिमांना हस्तांतरित केल्याचा दावा करणे हा पूर्णपणे खोटा आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे अजूनही मुस्लिमांच्या कोट्याच्या पाठिंब्यावर उभे आहेत की, पंतप्रधान मोदींना शरण जाऊन त्यांची भूमिका बदलली का?, मुस्लिमांना आरक्षण देण्याचा दावा करणारे देवगौडा आजही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे का? असा सवालही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in